क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

सैन्यदलात अग्नीवीर भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा एम डी विद्यालयात सत्कार

प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री प्रकाशभाई शहा हे उपस्थित होते

Kiran G.Patil M.No.8884357516


अर्जुननगर (24) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात सैन्य दलात अग्नीवीर पदावर भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री प्रकाशभाई शाह हे उपस्थित होते.  प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांनी केले त्यानंतर ऋत्विक खवरे, साईनाथ खोत, प्रशांत खवरे,अनुप कोरगावकर, नितीन बुदिहाळे, सूर्यदेव रानमाळे, विवेक कदम, रोहित भोंगाळे, निलेश चौगुले, रोहित बोंगार्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार मूर्तींनी सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतातून शाळेचे व शिक्षकांचे कृतज्ञता पूर्वक आभार मानले. तसेच त्यांचे स्वानुभव सांगून जिद्द चिकाटी प्रयत्न यांच्या जोरावर स्पर्धेत टिकून राहून यश मिळवता येते असे मत मांडले. यानंतर गणित ओलंपियाड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आर डी देसाई यांनी आपल्या मनोगतातून सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन एन जे खेबुडे यांनी केले तर आभार डी बी बेनाडे यांनी मांडले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक आर एस भोसले शिक्षक प्रतिनिधी आर आर कपले आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!