आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसर

निपाणीत प.पु.आचार्य श्री आर्यनंदी गूरूदेव यांचा 117 वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

दिप प्रज्वलन श्री.धर्मांनुरागी विनोदकुमार ने. देशमाने यांच्या हस्ते झाले!

Kiran G Patil M.No.8884357516


श्री 1008 आदिनाथ दि. सैतवळ जैन मंदिर, निपाणी आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था, शाखा कर्नाटक विभाग आयोजित तीर्थरक्षा शिरोमणी प.पु.१०८आचार्य श्री आर्यनंदी गूरूदेव यांच्या 117 व्या जन्मोत्सवा निमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. महाराजांचे पूजन, जयमाला व आरती नंतर सर्वप्रथम श्री 1008 आदिनाथ दि. जैन सैतवळ मंदिराच्या विश्वस्त मंडळाने आचार्यश्रींच्या प्रतिमेचे पुजन केले.

दीप प्रज्वलन श्री. धर्मांनुरागी विनोदकुमार ने. देशमाने यांच्या हस्ते झाले.त्यानंतर आखिल दिगंबर जैन सैतवळ संस्था, कर्नाटक विभाग सचिव, सचिन देशमाने यांनी सर्व श्रावक व श्रविका यांचे स्वागत केले. व आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी सैतवळ संस्थेच्या कार्य बदल माहिती दिली. व आचार्यश्रींचा जन्म परिचय व त्यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती करून दिली. त्यानंतर समाज्यातील जेष्ठ श्राविका श्रीमती अलका ना. पुरंत यांनी महाराजच्या समाजाप्रती दिलेले योगदान आणी समाज सुधारणेसाठी केलेले भरीव कार्य याची सविस्तर माहीती करून दिली.

समाजातील कुमारी स्नेहा सचिन नागांवकर हिने CA फौंडेशन मध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळविला या बदल हिचा सत्कार करणेत आला. तमाम साधर्मी श्रावक व. श्रविका उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वाटप करून झाला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.नयना ढणाल यांनी केले.

या कार्यक्रमास विवेक देशमाने, अक्षय पुरंत,अशोक पुरंत, सम्मेद देशमाने, वर्धन नागांवकर, दीपक ढणाल, अतुल कंगळे,श्रीमती सुमंगला ढणाल, स्मिता नागांवकर, सौ संध्या देशमाने, सौ वृषाली देशमाने, वैशाली देशमाने,वेदिका पुरंत, अरुणा पुरंत,सोनिया पुरंत, राजश्री कंगळे, स्वाती कंगळे, राणी देशमाने, स्वाती नागांवकर, मंगल पलसे यांच्यासह अनेक श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!