आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिरगुपी ग्रामदेवता मरगुबाई मूर्तीवर किरणोत्सव!

यात्रेच्या दिवशी या अद्भुत प्रसंगाने भाविक भारावले!

Kiran G Patil M.No.8884357516


शिरगुपी ग्रामदेवता मरगुबाई देवालयामध्ये आज सकाळी 6 वाजून 59 मिनिटांनी एक अद्भुत प्रसंग घडला.सालाबाद प्रमाणे सर्व नागरिक मंदिराच्या समोर प्रसाद घेत होते. प्रसाद घेण्यात सर्व भाविक मग्न असतानाच एक अविस्मरणीय प्रसंग मंदिरामध्ये घडला तो म्हणजे ग्रामदेवता मरगूबाईच्या तेजस्वी मूर्तीवर एक ते दीड मिनिटांसाठी देवींच्या माथ्यावर किरणोत्सवाचे दर्शन झाले.

हा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमले होते. यात्रा कमिटीच्या वतीने यावर्षी सुयोग्य अशा नियोजनामध्ये प्रसाद वाटप केल्यामुळे नागरिकांतून यात्रा कमिटीचे कौतुक होत आहे.


यात्रा काळातील पहाटेच्या प्रसादा विषयी थोडेसे….

सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या बुधवारी शिरगुपी गावची श्री थळेश्वर मरगुबाई देवीची यात्रा असते प्रत्येक गावकरी मोठ्या उत्साहाने यात्रेसाठी देणगी देत असतात. त्यातून अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमासह एक वेगळ्या प्रकारच्या प्रसादाचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जाते. मंगळवारी जागराचा मुख्य दिवस असतो. त्यादिवशी गावातून पालखी प्रदक्षिणा काढली जातो. त्या दिवशी प्रत्येक सुहासिनी सर्व मंदिरात जाऊन ओटी भरून गोडाचा नैवेद्य देऊन आशीर्वाद घेत असतात. मंगळवार रात्री बारानंतर मानाच्या पाच बकऱ्यांचा बळी देऊन मरगुबाई देवीच्या मंदिरासमोर खारा प्रसाद केला जातो. प्रसाद वाटपाची सुरुवात पहाटे पाच वाजल्यापासून चालू होते. शिरगुपी गावातील प्रत्येक घरातील माणूस प्रत्यक्ष ताट वाटी पाणी बरोबर घेऊन जाऊन या प्रसादाचा लाभ घेत असतो. आजचा प्रसाद घेण्यासाठी 2000 पेक्षा जास्त लोक पाच ते सात या दोन तासाच्या वेळेत पोटभर प्रसादाचे सेवन करून आपापल्या घरी परतत असतात. प्रत्येक गावकऱ्याची यात्रा ही मरगूबाई देवालया जवळील पहाटेचा प्रसाद खाऊनच चालू होते.

ही पहाटेच्या यात्रा काळातील प्रसादाची बेळगाव जिल्ह्यातील एकमेव यात्रा असल्याचे परिसरात बोलले जात असून. हा प्रसाद देखील इतका उत्कृष्ट चवीचा होतो की खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यास यात्रा कमिटी देखील सरसावलेली असते. व आजच्या योग्य नियोजनामुळे यात्रा कमिटीचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यातच आज प्रसाद संपायच्या काही वेळ आधी मूर्तीवर किरणोत्सव झाल्यामुळे आजचा दिवस दुग्ध शर्करा योग जुळून आला होता असं म्हटल तर वावगे ठरणार नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!