आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी महात्मा बसवेश्वर संस्थेस तब्बल 10.59 कोटींचा निव्वळ नफा!

संस्थापक-अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी; संचालक मंडळाची बैठक संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी, ता.( 9) नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व 35 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या  श्री महात्मा बसवेश्वर संस्थेस मागील आर्थिक वर्षामध्ये तब्बल दहा कोटीहून अधिक नफा झाल्याचे काल एका पत्रकार परिषदेमध्ये संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सी बी कुरबेट्टी यांनी सांगितले त्यावेळी पुढे ते म्हणाले ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक कर्मचारी आणि निःस्वार्थी संचालक मंडळामुळे दरवर्षी संस्थेला चांगला नफा होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीड कोटीने नफ्यामध्ये वाढ झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी दिली. मंगळवारी आयोजित संचालक  मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.

प्रारंभी संस्थेचे मुख्य व्यवस्थापक शशिकांत आदन्नावर यांनी स्वागत केले. डॉ. कुरबेट्टी म्हणाले, संस्थेचे ५५८६७ सभासद, ८७ लाख ६९ हजार ७०० भाग भांडवल, ५१९ कोटी ६७ लाख ६९ हजार ठेवी, ३७८ कोटी ६८ लाख ७४ हजार रुपये कर्ज वितरण केले आहे. ५४ कोटी ६२ लाख ९८ हजार रुपये निधी, १८६ कोटी ४४ लाख ७३ हजारावर गुंतवणूक, ६१९ कोटी ६३ लाख ६१ हजारांवर खेळते भांडवल, ४१९६ कोटींची वार्षिक उलाढाल होऊन संस्थेला यावर्षी १० कोटी ५९ लाख ३२ हजारांवर निव्वळ नफा झाला आहे. कर्जाची ९५ टक्के वसुली झाली आहे. संचालक श्रीकांत परमणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुरेश सी. शेट्टी संचालक डॉ. एस आर पाटील  किशोर बाली, श्री प्रताप एस पट्टणशेट्टी, श्री श्रीकांत बी परमणे,  श्री. महेश व्ही बागेवाड़ी, श्री.अशोक लिगाडे श्री सदानंद ए दुमाले, श्री प्रताप जे मेत्राणी, सौ पुष्पा सी कुरबेट्टी, श्रीमती विजया ए शेट्टी, सौ. सुवर्णा पी पट्टणशेट्टी, श्री.सदाशीव एन धनगर, दिनेश पाटील, संस्थेचे सी ई ओ शशिकांत आदन्नावर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुरज घोडके यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!