आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयात आशिषभाई शाह यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न!

महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी केले अध्यक्षांचे अभिष्टचिंतन!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त हृदयविकार व प्रथमोपचार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यासाठी मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर सीपीआर चे सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ.किरण भिंगार्डे हे लाभले होते.

    कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या प्रो.डॉ. जी. डी. इंगळे यांच्या स्वागत व प्रास्ताविकांनी झाली. त्यांनी महाविद्यालयाच्या झालेल्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले. पाहुण्यांचा परिचय आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. पी.डी.शिरगावे यांनी करून दिला. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह यांचा महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्षा डॉ.सौ.तृप्तीभाभी शाह तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ.सुनील ससे व डॉ. मीना ससे आदी उपस्थित होते. 

 डॉ.किरण भिंगार्डे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे प्रथमोपचार पद्धत कशी असते याचे सादरीकरण केले. तसेच त्यांनी तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला. ताण तणावाचा विपरीत परिणाम शरीरावर होतो आणि म्हणूनच हृदयविकारासारखे आजार संभवतात. प्रथमोपचार योग्य वेळी केल्यास हृदयविकारापासून दगावणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार डॉ.सुजाता पाटील यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!