आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंदच्या तृतीय वर्ष छात्रसैनिकांचा निरोप समारंभ उत्साहात!

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदर मेजर रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


छात्रसेना व व्हाईट आर्मी विभाग देवचंद महाविद्यालय अर्जुननगर यांचे संयुक्त विद्यमाने सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण ( 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.कोल्हापूर),व्हाईट आर्मी कोल्हापूर चे संस्थापक मा.अशोक रोकडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्या डाॅ.जी. डी.इंगळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर प्रथम परवाच झालेल्या अग्निवीर भरतीमध्ये देवचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सैनिक म्हणून निवड झालेल्या छात्रांचा साईनाथ खोत, प्रशांत खवरे, विशाल भोसले, राजवर्धन देसाई,अथर्व किरण पाटील, निरंजन पाटील, अश्विनी धोंडफोडे, प्राजक्ता सावंत यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय थलसेना कॅम्पमध्ये सहभागी होवून मॅपरिडींग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जे.यु.ओ.आकांक्षा आरडे, बेस्ट सिनीयर म्हणून एस.यु.ओ.ओंकार खोत, बेस्ट कॅडेट 2024 म्हणून वैष्णवी चौगुले, बेस्ट लिडर म्हणून श्रध्दा पाटील, हर्षदा खाडे, प्रथमेश भोसले, प्रणव सांगवडे तर व्हाईट आर्मी डी.सी.ए.संयोजक म्हणून अमित कांबळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण यानी सांगीतले की मी या काॅलेजचा माजी विद्यार्थी असून आज मी लष्करात या पदावरती पोहचलो त्यामध्ये देवचंद कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या सारख्या असंख्य विद्यार्थ्यांचे कल्याण या काॅलेज मुळेच झाले आहे.सर्व छात्रांनी इथे गुरूकडून मिळणार्‍या संस्कार शिदोरीवर आपले आयुष्य घडवावे.मला अभिमान आहे मला इथे शिकायला मिळाले.मी अभिमानाने सांगतो की देवचंद महाविद्यालयाचा एन.सी.सी.विभाग एक नामांकित युनिट आहे.

अशोक रोकडे यानी बोलताना सांगीतले की आजच्या युवपिढीवर या वयातच समाजसेवेचे संस्कार करायला पाहिजेत तरच समाजातील व्रृध्दाश्रमांची वाढती संख्या कमी होईल, याकरिता व्हाईट आर्मी यथायोग्य प्रयत्न करीत आहे. मला आनंद वाटतो की या उपक्रमात देवचंद महाविद्यालय अग्रेसर आहे. हा आदर्श घेऊन इतर महाविद्यालये सहभागी होत आहेत.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डाॅ.जी.डी.इंगळे म्हणाल्या  आमच्या महाविद्यालयाचा एन.सी.सी.विभाग खूप कार्यक्षम, उपक्रमशील, छात्राच्या सर्वांगीण विकासाकरिता सतत प्रयत्नशील असणारा आहे. पुढे अध्यक्षांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण यांना देवचंद महाविद्यालयाच्या छात्रसेनेच्या तुकडीची संख्या वाढवण्याची विनंती केली.

निरोप समारंभाच्या निमित्त ओंकार खोत,प्रथमेश पाटील,मयूरी चौगुले ,आकांक्षा आरडे व वैष्णवी चौगुले यांनी आपल्या मनोगतात एन.सी.सी. विभागाने तीन वर्षांत छात्रांच्या कौशल्य विकासात घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करुन शिक्षक वृंदा विषयी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी छात्र सेना व व्हाईट आर्मीच्या छात्रांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्रसेना व व्हाईट आर्मी विभाग प्रमुख मेजर डॉ. अशोक डोनर यांनी केले, आभार प्रदर्शन सृष्टी पाटील व पूजा तोरसे यांनी तर सूत्रसंचालन समीक्षा भोसले व साक्षी खराडे यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ सुर्यवंशी,सौरभ पोटले,अभिजीत साबळे,मतकरी एस.एस.यानी परीश्रम घेतले. यावेळी उपप्राचार्य ए.डी.पवार, पर्यवेक्षिका एस. पी.जाधव, डाॅ रवींद्र चव्हाण, प्रा.प्रशांत कुंभार व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डाॅ.तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह, कर्नल पुनीत गोगीआ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमानंतर सर्वांकरीता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!