आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद मध्ये इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा!

कार्यक्रमाची सुरुवात विलियम शेक्सपियर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली!

Kiran G.Patil M.No.8884357516


मंगळवार ,23 एप्रिल 2024 अर्जुननगर : येथे विलियम शेक्सपियर जयंती निमित्त इंग्रजी विभागामार्फत ‘इंग्रजी भाषा दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ इंद्रजीत कांबळे यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या व त्यांच्या मार्गदर्शिका प्रो डॉ जी डी इंगळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विलियम शेक्सपियर यांच्या प्रतिमा पूजन  करून झाली .याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना इंद्रजीत कांबळे यांनी आपण जिम कॉर्बेट या लेखकाच्या पुस्तकावर आधारित केलेल्या ‘द इमेज ऑफ इंडिया इन द वर्क्स ऑफ जिम कॉर्बेट :ए स्टडी फ्रॉम ऑरिऍटेलिस्टिक परस्पेक्ट’ संशोधन कार्याचा आढावा घेतला. त्यासाठी मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या प्रो डॉ जी.डी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण करणारा तो पहिला विद्यार्थी बनला. यावेळी त्यांनी देवचंद महाविद्यालय व मार्गदर्शिका ,अध्यापन केलेल्या सर्व प्राध्यापकांचे आभार मानले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ जी डी इंगळे म्हणाल्या की इंग्रजी साहित्य हे विल्यम शेक्सपियर यांच्या लेखन कार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी इंग्रजी साहित्यात दिलेले योगदान अमूल्य आहे. आणि त्यामुळेच 23 एप्रिल हा दिवस इंग्रजी भाषा दिन म्हणून जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी त्यांनी विल्यम शेक्सपियर यांच्या लेखन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.

सूत्रसंचालन प्रा.बी जी पाटील यांनी केले तर आभार प्रा.मनीषा हत्तीनगे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!