आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

रयत संघटनेच्या बिनशर्त पाठिंब्याने शंभू कल्लोळीकराचे बळ वाढले!

रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी माध्यमांना दिली माहिती! 

किरण गोपाळराव पाटील मो.न. 8884357516


केंद्र सरकारने तीन काळे कायदे करण्यासाठी शेतकऱ्यांनवर  अन्याय केलेला असून अनेक निरपराध शेतकऱ्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले, यासाठी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे, कोणतीही जात, पात, पक्ष न पाहता चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजू कल्लोळीकर यांना प्रचंड मताने निवडून देऊन लोकसभेत पाठवण्याचा निर्धार कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळीकर यांच्या पाठीशी रयत संघटना राहणार असून त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना राजू पोवार म्हणाले ऊस, सोयाबीन, तंबाखू या पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या वरती सरकारने अन्याय केलेला आहे, लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला निवडणूका लढणे मुश्किल झालेल्या आहेत. यासाठी घराणेशाही आणि भांडवलशाही मोडीत काढण्यासाठी शंभू कल्लोळीकर सारख्या व्यक्तिला आपण सर्वजण प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन राजू पोवार यांनी केले…

 यावेळी शिवाजी माने, संभाजी पाटील, किसन नंदी, संजय नाईक, सर्जेराव हेगडे, प्रकाश नायक, नारायण चव्हाण, उत्तम माडेकर, शितल कांबळे, नामदेव साळुंखे, तानाजी पाटील, बाबासाहेब पाटील, कलगोंडा कोटगे, कुमार पाटील, सुरेश गाडीवड्डर, इराण्णा पाटील, यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!