आपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

अश्लील व्हिडिओ क्लिप प्रकरणी शिरगुपी (ता. निपाणी) येथील एकाची एसआयटी कडून चौकशी!

खा.प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ क्लिप प्रकरणाचे धागेदोरे इतक्या दूरवर पसरले आहे.!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी, ता.(11) लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर कर्नाटकात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेले खा. प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ क्लिप प्रकरणात शिरगुपी (ता. निपाणी) एका शेतकऱ्याला अडकवल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्याचे बंद असलेले मोबाईल सिम कार्ड वापरून इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून त्यावर व्हिडिओ बघितले असल्याची धक्कादायक माहिती एसआयटी पथकाच्या तपासात उघडकीस आली आहे.

त्यानुसार एसआयटी पथकाने शिरगुप्पी येथे येऊन संबंधित मोबाईलची धारकाची चौकशी करून पुढील तपास चालविला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खा. प्रज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा एसआयटी कडून तपास सुरू आहे. दरम्यान शिरगुपी येथील एका शेतकऱ्याचे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या सिम कार्ड वापरीत इंस्टाग्रामवर सदर खा. रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ अपलोड करून बघितल्याचे स्पष्ट झाले.

या घडलेल्या प्रकरणामुळे शिरगुपी व परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांसह युवा वर्गाने देखील कमी पैशात सिम कार्ड मिळतात म्हणून त्याचा मोह टाळणे गरजेचे असल्याचे परिसरातून बोलले जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!