आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

तब्बल 35 वर्षांनी भरली शाळा! 

कुमार भवन कडगाव (ता. भुदरगड) शाळेचे विद्यार्थी आले तासाला!

Kiran G.Patil M.No.8884357516


कडगाव तालुका भुदरगड येथील कुमार भवन या शाळेचे 1989 -90 च्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल 35 वर्षांनी एकत्र येऊन गाठीभेटी कार्यक्रमाचा आनंद लुटला.

बालपण देगा देवा म्हणत सर्वच आजची तरुण पिढी आपले बालपण आठवण्यात मग्न असते त्यातच जर बालपणीचे आपले सवंगडी एकत्र येऊन मौजमस्ती करणार असतील तर कोणाच्याही आनंदाला पारावर उरत नाही. अशीच काहीशी संकल्पना घेऊन कुमार भवन कडगावच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 35 वर्षांनी एकत्र येण्याचा घाट गेली दोन वर्ष सर्वजण फोनवर बोलून घालत होते. पण तो दिवस उजाडला 19 मे 2024 चा.

प्रारंभी सर्व सवंगड्यानी सकाळपासूनच यायला सुरुवात झाली. सर्वजण एकत्र आल्यानंतर सर्वाच्या भेटीगाठी व ओळखी झाल्या. शाळेच्या समोर असणाऱ्या सरस्वती देवीच्या मूर्तीची सर्व विद्यार्थिनीं मनोभावे पूजा केली. दहाच्या घंटेला सर्व विद्यार्थी वर्गामध्ये हजर झाले. त्यातीलच एका विद्यार्थी मित्राने येणाऱ्या प्रत्येक सवंगड्याचे गुलाब पुष्प देऊन प्रथम स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमासाठी मुबंई, पुणे, कोल्हापूर,कोकण विभागातून विधार्थी, विद्यार्थिनीं आले होते.वर्गामध्ये सुरुवातीला वजीर मकानदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. प्राजक्ता शुक्ल हिने प्रास्ताविक केले. व बाबासाहेब देसाई यांनी मनोगत व आभार मानले यावेळी प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनीनी आपआपले विचार व ओळख करून दिली.दुपारी स्नेहभोजन झाले.

सर्व विद्यार्थिनींनी देखील तब्बल 35 वर्षांनी शाळेच्या पटांगणात एकमेकींना भेटत असल्यामुळे त्यांच्याही जुना आठवणींना उजाळा देत हसत खेळत त्यांनी देखील या गाठीभेटी कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रमात शोभा वाढवली.

सदर गाठीभेटी कार्यक्रमांमध्ये आपले दैनंदिन सर्व व्यवहार बाजूला ठेवून थोडा वेळ म्हणून एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अशी काही धमाल उडवली की कार्यक्रम संपुच नये असे वाटत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!