आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी बसवाण नगर येथे भिंत पडुन एक महिला किरकोळ जखमी!

मान्सून पुर्व पावसाने झालेल्या हाणीत जनजीवन विस्कळित!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी (24) प्रतिनिधी 

बसवान नगर,निपाणी येथे काल झालेल्या वादळी पावसाने अंगावर भिंत पडून एक महिला किरकोळ जखमी झाली असून दैवबलत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढणाऱ्या श्रीमती रत्नाबाई पांडुरंग साळुंखे यांच्या नांवे असलेल्या घराची भिंत काल वादळी पावसाने त्यांच्या सूनबाई आनंदी साळुंखे घरकाम करताना यांच्या अंगावर अचानक पणे पडली. त्यामुळे काही काळ तारांबळ उडाली. अडकलेल्या आनंदी साळुंखे यांना सुखरूप पणे बाहेर काढण्यात आले. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच  निपाणी तलाठी आनंद मडीवाळ व त्यांच्या  सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व कुटुंबातील सर्वांची विचारपूस केली व शासकीय मदतीचे आश्वासन दिले. सदर महिलेचे हातावरचे पोट हलाखीची परिस्थिती त्यात ही नैसर्गिक आपत्ती त्यामुळे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडून गेले आहे. सर्व सामान्य जनते कडून ही मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!