आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सलग तिसऱ्या वर्षी महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन!

रविवार दिनांक 16 रोजी वर्धापन दिनानिमित्त!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (11)

येथील महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 16 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. सी बी कुरबेट्टी यांनी दिली. विजापूर येथील ज्ञान योगाश्रमाच्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या स्मरणार्थ महात्मा बसवेश्वर व अक्कमहादेवी जयंती निमित्त सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले आहे

निपाणी चिकोडी तालुक्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा बसवेश्वर अक्कमहादेवी व अल्ल मप्रभू यांच्या वचन तोंडपाठ आणि वक्तृत्व स्पर्धा कन्नड, मराठी, इंग्रजी भाषेत आयोजित केलेल्या आहेत.

वचन तोंडपाठ स्पर्धेसाठी पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे रुपये 1001 501 201 रुपयांची बक्षिसे आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी गटासाठी “बसवन्नाच्या वचनातील जीवनमूल्ये व त्याचे जीवन”, “अक्कमहादेवी  यांच्या वचनांचे संदेश व त्यांचे जीवन”, आणि “शिवशरणांचे अनुभव मंडप” असे विविध विषय आहेत. आठवी ते नववी गटासाठी “महात्मा बसवेश्वर व सामाजिक क्रांती”, “अक्कमहादेवी जीवन साधना” आणि “शिवशरणांच्या दृष्टिकोनातून स्त्री” हे विषय आहेत. नाव नोंदणीसाठी जवळच्या शाखेत किंवा आपल्या शाळेत संपर्क साधण्याची आवाहन केले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!