आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव जाधव यांच्याकडे समन्वयक पदाची अतिरिक्त जबाबदारी!

बी.ए. फिल्म मेकिंग कोर्सचे डॉ. शिवाजीराव जाधव नवे समन्वयक

Kiran G.Patil M.No.8884357516


कोल्हापूर : निपाणी नगरी वृत्तसेवा(10)


शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता जनसंवाद विभागातील सहायक प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांच्याकडे बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाचे अतिरिक्त समन्वयक पद देण्यात आले आहे. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी नुकतेच या संदर्भातील निर्देश दिले आहेत.व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी डॉ. जाधव यांना नुकतेच समन्वयक पदाचे पत्र सुपूर्द केले आहे.

नियुक्तीसाठी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांचे सहकार्य मिळाले. विद्यापीठात प्रथमच चित्रपटाशी संबंधित बारावीनंतर तीन वर्षांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांची अभ्यासक्रमाच्या समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे.

डॉ. जाधव यांना पत्रकारितेचा 16 वर्षांचा अनुभव आहे. त्याचे सद्यस्थितीवरचे अनेक लेख अनेक वर्तमानपत्रांमध्ये अभ्यास स्वरूपात प्रसिद्ध होतात. त्यांनी परवाच एका वृत्तपत्रात आर्टिफिशल इंटेलिजंट संदर्भातील लेख लिहिला होता व तो अतिशय वाचनीय होता. ते सध्या एम.ए. मास कम्युनिकेशन कोर्सचे समन्वयक आहेत. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचेही ते समन्वयक आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!