आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

“निपाणी तालुका मीडिया क्लब” अध्यक्षपदी गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची बिनविरोध निवड!

शासकीय विश्रामधामावर निवड प्रक्रिया संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी ता (16)

काल निपाणी शासकीय विश्रामधामावर आयोजित केलेल्या निपाणी मीडिया क्लबच्या मीटिंगमध्ये सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यामध्ये अध्यक्षपदी महान कार्य न्यूजचे पत्रकार गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी निपाणी नगरी.कॉम वेब पोर्टलचे संपादक पत्रकार किरण पाटील यांची तर सेक्रेटरी पदी जनसेवा न्यूज चॅनेलचे पत्रकार  संतोष मात्तीवड्डर यांची निवड करण्यात आली. संघटना सचिव  कार्यदर्शीपदी शिवबसव लाईव्हचे पत्रकार  चेतन सनदी यांची निवड करण्यात आली. प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक पत्रकार संजय कांबळे यांनी केले.

यावेळी सत्काराला  उत्तर देताना मीडिया क्लबचे नूतन अध्यक्ष गौतम जाधव म्हणाले, पत्रकार समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना व गोष्टीचे वृत्तांकन करत असतात. लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पत्रकार करत असतात. आज सर्वांच्या मताने अध्यक्ष म्हणून माजी बिनविरोध निवड केलेली आहे, येणाऱ्या काळात सर्व पत्रकारांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले.

उपाध्यक्ष किरण पाटील म्हणाले.अन्यायासाठी झगडण्यासाठी आमचा पत्रकार संघ नेहमी सदैव तयार असतो, विविध सामाजिक समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात. भविष्यकाळात देखील मला सोपवलेल्या जबाबदारीतून आपणा सर्वांच्या सहाय्याने सदैव प्रयत्नशील राहीन.

सेक्रेटरी पदी निवड झाल्यानंतर संतोष मातीड्डवर म्हणाले , मीडिया क्लबच्या पत्रकारांनी माजी सेक्रेटरी पदी निवड केल्याने मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने काम करत राहणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी संघटनेचे कार्यदर्शी चेतन सनदी म्हणाले की निपाणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा आवाज गरिबांचा आवाज दिन दलितांचा आवाज उठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

यावेळी पत्रकार विश्वनाथ हलगे, नागेश पुजारी हनुमंत सैनसाखळे, सुरेश सैनसाखळे सय्यद अफसर पटेल, लक्ष्मण अष्टेकर, उपस्थित होते. आभार विश्वनाथ हलगे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!