आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न!

प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे संचालक ॲडव्होकेट श्री.बी बी पाटील होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


अर्जुननगर, निपाणी नगरी प्रतिनिधी (16)

येथील मोहनलाल दोशी विद्यालयात शैक्षणिक सन 2024-25 मधील नवप्रवेशित विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे संचालक .ॲडव्होकेट श्री.बी बी पाटील होते , यावेळी त्यांनी सर्वांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या “

नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच औक्षण करून आगमन झाले तसेच मान्यवरांच्या हस्ते,गणवेश, पाठयपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांनी प्रास्ताविकातून शाळेचा विविध क्षेत्रातील यशाचा वारसा व नावलौकिक सांगितला.  इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आठवीच्या एन एम एम एस व स्कॉलरशिप परीक्षा, स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन श्रीमती एस.व्ही पाटील यांनी तर आभार श्री एस बी यादव यांनी मानले

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक श्री आर डी पाटील, श्री आर एस भोसले शिक्षक प्रतिनिधी श्रीमती आर आर कपले ,कर्मचारी प्रतिनिधी श्री. बी एल तिप्पे, यु एम सातपुते, एस के बुच्चे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह , यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!