आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

धनलक्ष्मी पतसंस्थेचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!

संस्था संचालक महेंद्र सांगावकर यांच्या हस्ते फोटो पूजन करून कार्यक्रमास सुरुवात!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18)

येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण सहकारी संस्था श्री धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित या संस्थेचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संचालक श्री महेंद्र सांगावकर यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी पूजन करून करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष कै. विश्वासराव तुकाराम शिंदे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने दिवसेंदिवस प्रगती केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योग धंद्यांना आर्थिक पुरवठा केला असून संस्था स्थापने पासून सभासदांना डिव्हडंड देण्यात येत आहे. संस्थेचे संपूर्ण संगणकीकरण केले असून थर्ड पार्टीचे क्लिअरिंग, अत्यल्प दरात डिमांड ड्राफ्ट, स्टॅम्प पेपर, चेक इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत. तसेच कर्जपुरवठा करून या संस्थेने आपल्या सर्व सभासदांच्या मनात पत निर्माण केली आहे. कै. विश्वासराव शिंदे यांच्या पश्चात या संस्थेचे नेतृत्व त्यांचे बंधू व विद्यमान नगरसेवक श्री रवींद्र शिंदे हे करत असून यांना कुशल संचालक मंडळ आणि प्रामाणिक व जिद्दी कर्मचारी वर्गाची साथ लाभली आहे. त्यामुळे या संस्थेची दिवसेंदिवस भरभराट होत आहे.

संस्थेचे संचालक श्री सुनील काळगे यांनी बोलताना सांगितले की संस्थेची भव्य अशा वस्तूचे बांधकाम सुरू असून संस्था नवीन वस्तूत लवकरच ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र शिंदे व्हाईस चेअरमन मधुकर खवरे संचालक सर्वश्री सुनील वाडकर अनिल सांगावकर सुभाष कुकडे राहुल शिंदे विजय साळुंखे परशुराम कांबळे सुनीता शिंदे सुप्रिया चोरगे यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत श्री संतोष व्डडगे यांनी केले तर आभार श्री विजय कदम यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!