आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील साहित्यिक अजित सगरे यांच्या भेटीला!

राहत्या घरी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केला सत्कार!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18)

सीमा भागातील मराठी भाषा, साहित्य, समाज, संस्कृती, संवर्धन व विकास करणे ,यासाठी सर्व सामान्य मराठी माणसांच्या वर होणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, भाषिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी या सर्व क्षेत्रातील गळचेपी बद्दल वास्तववादी माहिती घेऊन आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून या सीमा भागातील प्रलंबित असणाऱ्या सर्व मागण्या सोडवून घेण्यासाठी , येत्या अधिवेशनापूर्वी सीमा भागातील साहित्यिक चळवळीचे जुने नवे कार्यकर्ते व इतर समाजातील सर्व घटकांचे प्रातिनिधीक शिष्टमंडळ घेऊन जाऊन , महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या मराठी भाषिक 865 गावांच्या संदर्भात आज पर्यंत सीमाभागा विषयी काढलेले सर्व प्रकारचे प्रलंबित असलेले जीआर व त्यामध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून नवा जीआर शासनाला काढायला लावून सीमा भागावर आज पर्यंत झालेल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी या शिष्टमंडळासह मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे व सीमा भागाशी संबंधित असलेले सर्व मंत्री सचिव यांच्याशी पाठपुरावा करणार आहे. आणि सीमा भागाला न्याय मिळवून देण्याबरोबरच, सीमा भागाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवणार आहे.”असे उद्गार साहित्यिक दि. बा. पाटील यांनी अजित सगरे यांच्या निवासस्थानी काढले.

साहित्यिक दि.बा. पाटील हे प्रा. अजित सगरे यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, पुरोगामी व साहित्यिक चळवळीतील गेल्या चार दशकाहून आजतागायत करत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी कामेश्वरी साहित्य मंडळ ,कामेरी, वाळवा – शिराळा कवी – लेखक संघटना, इस्लामपूर, स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी,व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर.या सर्व संस्थांच्या वतीने गौरव करण्यासाठी निपाणीत आलेले असताना मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी वरील संस्थांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक दि बा पाटील यांनी अजित सगरे यांचा सत्कार केला. यावेळी वरील संस्थांच्या वतीने देखील पुरोगामी व साहित्य चळवळीत काम करणारे डॉ. चंद्रशेखर कांबळे, राधानगरी, यांना डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी मिळाल्याबद्दल या संस्थांच्या वतीने अजित सगरे यांच्या हस्ते दि.बा. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सीमा भागातील विविध संस्था व व्यक्ती यांच्यावतीने साहित्यिक दि.बा. पाटील, 75 हुन अधिक ग्रंथ लिहिणारे. राज्य व राष्ट्रपती पदक विजेते साहित्यिक, तरुण लेखक डॉ. श्रीकांत पाटील व डॉ. चंद्रशेखर कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

सत्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अजित सगरे यांनी हा सत्कार हा  त्यांनी 1972 पासून आज पर्यंत झालेले लोकलढे देणाऱ्या सर्व नेतृत्वाला व कार्यकर्त्यांना आणि भूमिपुत्रांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समस्त जनतेला अर्पण केला.

सीमा भागातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या संवाद कार्यक्रमात खालील मागण्या एकमताने मंजूर करून सीमा वाशीयांच्या शिष्टमंडळाच्या वतीने दि बा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या कडे पाठपुरावा करण्याचे ठरले.

*मागण्या खालील प्रमाणे*

१) महाराष्ट्र शासनाच्या जनतेसाठी असलेल्या सर्व घटकातील सोयी सवलती सीमा भागातील 865 गावांना मिळाल्या पाहिजेत.

२) महाराष्ट्र शासनाच्या विविध घटकासाठी ज्या कल्याणकारी योजना आणि सोयी सवलती आहेत. त्या सर्व सोयी जशाच्या तश्या 865 गावातील रहिवाशांना व सर्व घटकांना आधार कार्ड ग्राह्य धरून मिळाव्यात, त्यासाठी असणाऱ्या तांत्रिक- जाचक अडचणी दुरुस्त करून त्या लागू कराव्यात.

३) सीमा भागातील 865 गावांमध्ये मराठी भाषा साहित्य संवर्धनासाठी, तरुणांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने, मराठी माध्यमाच्या शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, कृषी संस्था, क्रीडा संस्था इ. सर्व प्रकारच्या संस्था उभ्या कराव्यात.

४) महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व निमशासकीय ज्या संस्था आहेत त्या संस्थावर सीमा भागातील एक प्रतिनिधी घ्यावा.

५) साहित्यिक, प्रयोगशील शेतकरी, कलाकार, कलावंत, पत्रकार , पर्यावरणवादी इ. सर्व क्षेत्रातील घटकांना महाराष्ट्रा प्रमाणेच सवलती मिळाव्यात.

६) सीमा भागातील मराठी संवर्धनासाठी भरत असलेल्या सर्व साहित्य संमेलनाना महाराष्ट्र शासनाने समान भरघोस अनुदान द्यावे. व ते अनुदान त्या त्या साहित्य संस्थांच्या बँक खात्यावर एक महिना अगोदर जमा करावे.

७) महाराष्ट्र शासनाचे विविध क्षेत्रासाठी असणारे जे जे शासकीय पुरस्कार आहेत त्या त्या पुरस्कारासाठी 865 गावातील पात्र असणाऱ्या लोकांनाही देण्यात यावेत.

८) महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणेच कर्नाटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्याला मागासवर्गीय म्हणूनच संबोधावे म्हणजेच त्याला महाराष्ट्रा प्रमाणे सर्व सवलती मिळाव्यात.

याप्रसंगी बोलताना डॉ. अच्युत माने ,यांनी सीमा भागातील चळवळींचे वैशिष्ट्य सांगून ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी पक्ष विरहित व धर्म विरहित अशा सगळ्या घटकांनी एकत्र येऊन हा लढा पुन्हा उभा करूया असे उद्गार काढले, तर डॉ. एन डी जत्राटकर यांनी चळवळीचे जे प्रमुख असतात त्यांनी श्रेय वादाचा विचार न करता थांबलेली चळवळ पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी गट तट अहंकार बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन या भागातील विकासासाठी पुन्हा एकत्र येऊन हा लढा सुरू ठेऊया असे मत मांडले.

यावेळी निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर व माजी सभापती व विद्यमान नगरसेवक बाळासाहेब देसाई प्रा .नानासाहेब जामदार, एडवोकेट अविनाश कट्टी, प्रशांत गुंडे, राजू मिस्त्री, जयराम मिरजकर, अजित पाटील कुर्लीकर, विठ्ठल वाघमोडे व इतर मान्यवरांनी या संदर्भात आपले विचार मांडले.

प्रास्ताविकात अजित सगरे यांनी दि.बा .पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांचे असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेऊन , सीमा प्रश्नासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र शासनाने सीमावाशीयांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्यांना दिलासा द्यावा व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे मत मांडले.

यावेळी स्वागत सुनील हेगडे यांनी केले व सूत्रसंचालन पत्रकार सुशील कुमार कांबळे यांनी केले. तर आभार पर्यावरणवादी अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास प्रा. आनंद संकपाळ, सुनील किरळे, राजू रांगोळे, संजय संकेश्वरे, रवी प्रसाद आवटे, रवींद्र शिंदे, विनोद बल्लारी, पैलवान आप्पासाहेब खोत , विजय चंद्रकुडे,भूतपूर्व सैनिक विजय निर्मळे, मोहन जाधव, अनिल हेगडे, सचिन मोहिते, किरण कांबळे, बौद्धाचार्य कपिल कांबळे, जयसिंग कुरणे, सचिन कुरणे, प्रफुल्ल पटेल, कवी कबीर वराळे, विकास शिंदे , अजित पवार, इ. मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!