आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी शिवाजी नगर, खरी कॉर्नर परीसरातील नागरीकांचे निवेदन!

मुरगूड रोड ते गांधी हॉस्पीटल पर्यंत पिलर पुल उभारण्याबाबत!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (27)

मुरगूड रोड ते गांधी हॉस्पीटल पर्यंत पिलर पुल उभारण्याबाबत निपाणी शिवाजी नगर, खरी कॉर्नर परीसरातील सर्व नागरिकांचे विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन सादर.

निवेदनामध्ये पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गातील निपाणी परिसरातील या विस्तारीकरणामध्ये खरी कॉर्नर येथे लहान उड्डाण पुल असून तेथे रहदारीचा प्रश्न उभा राहतो. निपाणी शहराची लोकवस्ती वाढल्यामुळे महामार्गाच्या पलीकडे शाळा, दवाखाने, हॉटेल यांचा विस्तार झाला आहे. व खरी कॉर्नर पासून शिरगुपी, पांगिर, बुदलमुख, अर्जुनी, शेंडूर, गोंदिकुप्पी, यरनाळ, अर्जुनी या गावातील नागरीक, शाळकरी मुले, व्यावसायिक यांची वाहतुक कोंडी लहान उड्डाणपूलामुळे होत आहे. तरी या महामार्गाच्या विस्तारीकरणा मध्ये मुरगूड रोड ते गांधी हॉस्पीटल पर्यंत पिलर पूल ची निर्मिती व्हावी अशी सर्व शिवाजी नगर व खरी कॉर्नर परिसरातील नागरिकांच्या वतीने या अर्जाद्वारे विंनती करण्यात आली आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!