आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

महात्मा बसवेश्वर संस्थेत योग दिन साजरा!

योगशिक्षक प्रवीण पाटील यांची विशेष उपस्थिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (27)

संपूर्ण जगाला योगाची देणगी आपल्या देशाने दिली आहे. मागील पाच हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या देशाला योगाची परंपरा आहे. सन 2014 रोजी अखंड भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस करण्या संदर्भात ठराव मांडला. त्याला सर्वानुमते 193 पैकी 175 देशांनी सहमती दर्शवल्या नंतर 21 जून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस चालू झाला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस दहावा असून सर्वत्र मोठ्या उत्साहात दहावा योग दिवस साजरा केला जातो.

येथील चिकोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षक प्रवीण पाटील, संस्थापक चेअरमन सी.बी कुरबेट्टी प्रमुख उपस्थित होते. योगशिक्षक प्रवीण पाटील यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. कुरबेट्टी म्हणाले, सध्याच्या काळात माणसाला योगाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग करणे आवश्यक आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक मंगळवारी योगअभ्यास देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!