आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

(BATA) “बाटा” शोरूमचे निपाणी मध्ये भव्य उद्घाटन!

बस स्टॅन्ड पासून संगीता मोबाईलच्या बाजूस चिकोडी रोड निपाणी येथे!

Kiran G.Patil M.No.8884357516


सध्या एकंदरीत निपाणी शहराचा विचार करता विकासाच्या दृष्टीने रोजच्या रोज नवीन उद्योगधंदे येत असून ही निपाणी नगरीच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आहे. आज अनेक प्रकारच्या मल्टिनॅशनल कंपन्या निपाणी मध्ये आपला जम बसवत असून त्यामध्ये आत्ता सुप्रसिद्ध अशा “बाटा” (Bata) ब्रँडची भर पडली आहे.

रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी निपाणी बस स्टँड पासून काही अंतरावर असलेल्या संगीता मोबाईलच्या बाजूस भव्य अशा बाटा शोरूमच्या दालनाचे दिमाखात उद्घाटन झाले.

प्रारंभी निपाणीतील प्रसिद्ध “बाटा”(BATA) शोरूमचे फ्रॅंचाईजीचे मालक श्री राजीव शिंगे यांच्या मातोश्रीं श्रीमती रजनी सुरेश शिंगे यांच्या हस्ते फीत कापून शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार मालक राजीव शिंगे यांनी मानले.

या शोरूम मध्ये अनेक प्रकारचे शूज चप्पल सॅंडल लहान मुलांचे सर्व शूज चप्पल तसेच नवनवीन फॅशनचे महिलांना आवडणाऱ्या अनेक व्हरायटी येथे उपलब्ध असून काल पहिल्याच दिवशी अनेक ग्राहकांनी खरेदीचा आनंद घेतला. शोरूम मध्ये कमीत कमी 199 रुपयापासून 6999 रुपये पर्यंतच्या व्हरायटी उपलब्ध आहेत.

या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी सर्वश्री अविनाश कट्टी, रिटायर्ड असिस्टंट हेडक्वार्टर ऑफिसर मारुती असोदे, सुदर्शन शिंगे, पवन मेंडेगिरी, सचिन मधाळे, महावीर बागणे, जुबेर बागवान यांच्यासह निपाणी व परिसरातील शिंगे व मेंडेगिरी परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!