आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

वैद्यकीय, तंत्रशिक्षणाचे नंदनवन “संत गजानन महाराज शिक्षण समूह”

आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर संस्थेने गरुडभरारी मारली आहे!

Kiran G.Patil M.No.8884357516


व्यावसायिक शिक्षणाची गरज ओळखून महागाव (ता. गडहिंग्लज) येथील अँड. (डॉ.) अण्णासाहेब चव्हाण यांनी शेगावचे संत गजानन महाराज यांचे आशीर्वाद व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याचा वसा घेत संत गजानन महाराज शिक्षण समूहाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक बांधिलकीचा पाया भक्कम ठेवून शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर संस्थेने गरुड भरारी मारली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरा सारखे उच्चशिक्षण मिळावे या ध्येयापोटी समूहाचा विस्तार वाढवला. वैद्यकीय शिक्षणाबरोबर तंत्रशिक्षणाचे दरवाजे खुले केले. महागावात सुरू केलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होतानाच अपुऱ्या जागेमुळे निसर्गाच्या हिरवळीने नटलेल्या ऐतिहासिक सामानगडाच्या पायथ्याशी चिंचेवाडीच्या माळरानात ४० एकर जागेत कॅम्पस साकारला. विविध विद्याशाखेच्या भव्य इमारती उभ्या केल्या. मुलांना पारंपरिक व अत्याधुनिक व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान देण्याच्या हेतूने एकेक पाऊल यशस्वीपणे टाकत अभियांत्रिकी पदवीमध्ये पाच, पॉलिटेक्निक पदवीकेमध्ये सात अभ्यासक्रम, फार्मसीमध्ये डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी, नर्सिंगमध्ये बी.एस्सी. नर्सिंग, जीएनएम., एएनएम, आयुर्वेद, पॅरामेडिकलमध्ये एमएलटी, महाविद्यालय, रेडिओलॉजी, ऑफ्तेल्मिक, पीजी सिटी एमआरआय, डीएमएलटी तसेच नव्याने सुरू केलेली एमसीए, बी. एस्सी. ऑप्टोमेट्री अभ्यासक्रमा बरोबरच जयभारत इंग्लिश हायस्कूल व ज्ञानसागर हे सैनिक पॅटर्नचे विद्यानिकेतन असा प्रचंड ज्ञान खजिना येथे उपलब्ध करून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला समृद्ध आकार मिळत आहे.

याबरोबरच दोनशे बेडचे स्वतंत्र सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाहतूक व्यवस्था, मुला मुलींसाठी स्वतंत्र भव्य वसतिगृह, समृद्ध ग्रंथालय, क्रीडांगण, शासकीय सर्व सवलती, अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग, यातून शिक्षणाचा हा प्रवाह अखंड वाहतो आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी संस्थाध्यक्ष अँड. (डॉ.) अण्णासाहेब चव्हाण, सौ. विजयमाला चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सचिव अँड बाळासाहेब चव्हाण, श्री. बाळकू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण संकुलाची यशस्वी घोडदौड अखंड चालू आहे.

संत गजानन महाराज शिक्षण समूहाने हजारो युवकांना नोकऱ्या देऊन आत्मनिर्भर बनवले आहे. यावर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यूद्वारे नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या पटलावर नोकऱ्या देणारे म्हणून संत गजानन महाराज शिक्षण समूहाला आवर्जून उल्लेख केला जात असल्याची माहिती संस्थाध्यक्ष अँड (डॉ.) अण्णासाहेब चव्हाण यांनी निपाणी नगरी डिजिटल पोर्टलच्या संवाद कार्यक्रमात दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!