ताज्या घडामोडी
घरकुल योजनेच्या नावाखाली फसवणूक केल्यास मला संपर्क करा – अरुण माने
तळेगाव : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत व्हीआयपी कोट्यातून घर देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.या प्रकरणात अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणूक करणाऱ्या या टोळीने तळेगाव मधील नागरिकांनाही लाखोंचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर येत आहे.
जर अशा प्रकारे कोणी घरकुल योजनेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत असेल तर मला संपर्क करा असे आवाहन तळेगाव नगरीचे नगरसेवक अरुण माने यांनी सोशल मीडिया वरून केले आहे. नगरसेवक माने यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक देत फसवणूक झाल्यास त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.