आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निसर्ग आमचा गुरु, तेथून जीवन सुरु- नामदेव चौगुले!

साई मंदिरात पर्यावरणपूरक गुरुपौर्णिमा साजरी!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (21) निपाणी 

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अनन्यसाधारण असून ,निसर्गाने आमच्यासाठी सर्वकाही केले असून आपणही थोडे वसुंधरेसाठी करण्याची गरज आहे.यासाठी साईमंदिर परिसरात वृक्षारोपण आणि साईभक्तांसाठी गुलाब रोपे  वाटप करून पर्यावरणपूरक गुरुपौर्णिमा साजरी करणारे वृक्षमित्र, पर्यावरणप्रेमी शिक्षक म्हणजे नामदेव चौगुले हे निपाणी साईबाबा ट्रस्टच्या वतीने सन्मानित. 

प्रत्येक सणसमारंभ साजरा करताना निसर्ग हा डोळ्यासमोर ठेवून नामदेव चौगुले हे गेली तीस वर्षे काम करताना दिसतात..गुरुपौर्णिमेला वृक्षारोपण आणि वृक्ष रोपे वाटप करून समाजाला नवा आदर्श दिला. साई मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करणेत आला याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमात पुंडलिक वागळे, रंजना पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अनेक साई भक्त उपस्थित होते.प्रास्ताविक राम चव्हाण यांनी केले,आभार चेतन सूर्यवंशी यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!