आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

गोर गरिबांचा आधारवड – रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला

निपाणीच्या सामाजिक क्षेत्रातील उभरते नेतृत्व!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी (22) दादा जनवाडे

स्व. मोतीवाला सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि शुभरत्न केंद्र निपाणीचे रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस होत आहे या निमित्ताने…

वडिलोपार्जित व्यवसायाची परंपरा प्रत्येकजण चालवत असतात पण वडिलांनी निर्माण केलेल्या सामाजिक कार्याला तोडीसतोड सामाजिक कार्य करणे हे प्रत्येकाला जमत नाही. त्याला अपवाद ठरणारे, निपाणीचे सामाजिक कार्यकर्ते, हजारो गोरगरिबांना मदतीचा हात देणारे, युवकांचे प्रेरणास्थान, शुभरत्न केंद्र निपाणीचे रत्नशास्त्री ए एच मोतीवाला हे आहेत. आपले वडील स्व. रत्नशास्त्री एच ए मोतीवाला यांनी शुभरत्न केंद्राच्या माध्यमातून निर्माण केलेली व्यावसायिक उंची आणि त्यातून आलेल्या आर्थिक सधनतेतून केलेले सामाजिक कार्य त्याची सांगड घालत त्यांनी दोन्ही पातळीवर मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.  

शुभरत्न केंद्राच्या पाचव्या पिढीची जबाबदारी रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांच्याकडे आली. त्यांनी वडिलांनी निर्माण केलेले विश्व, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश, कोकण आदी भागातील ग्राहकांचा गोतावळा हे सगळं सांभाळणं त्यांच्याकडे आलं. वडिलांप्रमाणेच स्वभाव असल्याने आपल्या जवळ येणारा प्रत्येक माणूस जोडण्यात त्यांचा कसब आहे. वडिलांच्या नंतर शुभरत्न केंद्र चालवताना त्यांनी हजारो लोकांना संकट मुक्तीचा मंत्र दिला. रत्नशास्त्राच्या माध्यमातून अनेकांना संकट मुक्त केले. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आलेली आर्थिक सधनता ही फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर सामाजिक कार्यासाठी वापरायची हा वडिलांनी घालून दिलेला दंडक त्यांनी पाळला आहे. 

सामाजिक कार्याची आवड त्यांच्या अंगी पूर्णपणे उतरली आहे. त्यामुळे निराधार, गोरगरीब, असहाय्य माणूस दिसला की रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांच्या आतला खरा माणूस जागा होतो. मग त्याला सर्वच सहकार्य करण्याचं कार्य त्यांच्या हातून घडतं. अशा हजारो लोकांना त्यांनी आजपर्यंत मदत केली आहे. 

कोरोनाच्या काळात गोरगरिबांना धान्य वाटप असेल, अनेक शाळांना साहित्याचे वाटप असेल, विद्यार्थ्यांना मदत, अनेक संस्थांना मदत असेल, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत असेल, अनेक मंडळांना सामाजिक कार्यासाठी मदत, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन या सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्यापरीने योगदान दिले आहे. या समाजात आर्थिक सुलभता असलेली असंख्य लोक आहेत. पण आपलं आर्थिक स्थैर्य हे समाजाच्या उपयोगाला यावं ही भावना काही ठराविक लोकांच्या मध्ये असते. ती भावना मनापासून जपणारे आणि आपल्या बरोबरच या समाजाचे कल्याण झालं पाहिजे की भावना ठेवून नेहमीच सामाजिक कार्याला महत्त्व देणारे शुभरत्न केंद्राचे रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!