आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

आध्यात्मिक प्रगती साठी गुरू शिवाय पर्याय नाही- प.पू.बसवेश्वर महास्वामीजी !

श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठ येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (21)

येथील श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठ येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी सर्व प्रथम गुरू पूजन करण्यात आले. यावेळी बदामी येथील हसणुर मठ येथील परमपूज्य बसवेश्वर महास्वामीजी, परमपूज्य प्रभूलिंग स्वामीजी, श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी बदामी येथील परमपूज्य बसवेश्वर महास्वामी यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की भक्तांनी ईश्वर यांच्यामधील गुरु हा मध्य ध्रुव आहे गुरुच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहोचण्यास मदत होते. प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी गुरू असतोच फक्त त्याच्यावर श्रद्धा भक्ती ठेवून आपली कर्म करणे गरजेचे आहे. यावेळी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठ यांच्या वतीने चाललेल्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी प. पू.प्राणलिंग स्वामीजी  मार्गदर्शन करताना म्हणाले  गुरूंचा समृद्ध आणि संपन्न वारसा लाभणे सोपे असते, पण तो समर्थपणे पुढे चालवून त्यात मौलिक भर घालणे हे काम महाकठीण! परस्परांचे उन्नयन घडवून उभयतांना पूर्णावस्थेला नेणारा भारतातला हा गुरु-शिष्य स्नेह म्हणजे एक आश्चर्यच. सर्वगुणसंपन्न असणे गुरूंच्या कृपाशीर्वादा शिवाय शक्य होते का? अंधार असणाऱ्या वाटेवरून प्रवास करताना गुरू हा प्रकाश आहे. तिन्ही लोकं हे गुरूंना शरण जातात हे माहात्म्य आहे गुरूंचे. आपली भारतीय संस्कृती ही गुरू शिष्य या नात्यामुळेच महान झालेली आहे. आणि गुरूला चांगला शिष्य मिळाल्यामुळे  महत्व आहे असे मत प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यक्त केले यावेळी परमपूज्य प्रभुलिंग स्वामीजी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले यावेळी. बसवेश्वर मगदूम बेळगाव यांच्या कडून महाप्रसाद चे आयोजन केले होते. धूनगुंवडी भजणी मंडळ यांनी भजन केले. श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्ट व भक्तगणमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शेट्टी तर आभार सागर श्रीखंडे यांनी मानले  यावेळी डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी, चंद्रकांत कोठीवाले, गंगाधर पाटील, वज्रकांत सदलगे, सुनील माने, रवी शेट्टी, अभिजीत सादळक, प्रवीण बेल्लद, सह श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्ट व भक्तगणमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!