आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सौ.भागीरथीबाई शाह कन्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन!

अवधी पंढरी दुमदुमली, सर्वत्र भक्तीमय वातावरणात पालखीचे स्वागत!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (23) 

सौ. भा. शाह कन्या शाळा तसेच गर्ल्स मराठी कॉन्व्हेंट स्कूल निपाणी येथे मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा व विठु नामाचा जयघोष करीत दिंडी सोहळा साजरा करण्यात आला, दि फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका मा. सौ. प्रविणाभाभी शाह आणि संचालक  श्री. प्रसन्न दोशी तसेच सी.आर.पी. चे प्रमुख मा. श्री. के. बी. बन्ने यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थीनींनी पसायदान म्हटले. शाळेतील शिक्षिका सौ. एस.डी. काळे  यांनी चंद्रभागेच्या तिरी या गीताने ‌दिडीची सुरुवात केली. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा. डॉ.सौ. एस. जे. पाटील यांनी विद्यार्थीनींनी मध्ये वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी, भारतीय संस्कृतीची ओळख, अध्यात्माची गोडी, संतांची शिकवण आणि भक्ती मागची आवड निर्माण व्हावी. यासाठी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.

या दिंडीत विद्यार्थीनींनी विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत बाळू‌मामा संत जनाबाई, संत मुक्ताबाई आदी सताच्या वेशभुषेत सहभाग घेतला. यावेळी सर्व विद्यार्थीनींनी, शिक्षकांनी अभंग, ओव्या म्हणत टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल रामकृष्ण हरीनामाचा जयघोष करील दिंडीची सुरुवात छ. शिवाजी महाराज चौक, कामगार चौक, दर्गा गल्ली, भाट गल्ली,  जिजामाता चौक, कोरवी गल्ली, नरवीर तानाजी चौक, चाटे मार्केट, जुना मोटार स्टॅन्ड मार्गे काढण्यात आली. वि‌द्यार्थीनीनी भगव्या पताका, लेझीम, टाळ हाती घेऊन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या गजरात शहरातील मार्गावरुन पालखी शिक्षकांनी आणि विद्यार्थीनींनी  खांदयावर घेतली.निपाणीतील ग्रामस्थांनी दिंडीला पाणी घालून आरती ओवाळून खाऊ देऊन सर्वांचे स्वागत केले. माजी मुख्याध्यापक श्री. आर. पी. बामणे  आणि सी. एम. बाड़कर यांनी आपल्या खांदयावर पालखी घेऊन शाळेच्या प्रांगणात आली असता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  पाणी घालून आरती ओवाळून स्वागत केले.

शाळेच्या पटांगणावर फुगड्या घालून फेर धरून हरिनामाचा गजर करून रिंगण सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी शाळेतील एस. आर. इराज, यु. बी. नागावे, एम. एम. चिक्कोडे, पी. आर. पाटील, ए. आर. पाटील, ओ. एम. कुलकर्णी, वि. ए. निगवे, आर.एम. मधाळे, शीतल घाटगे, रविना घाटगे, कविता मंगसुळी, एस. आर. हवालदार, सुभाष माळी, जे. एम. शिंत्रे, जे. सी. चंद्रकुडे, जे.ए कुरबेट्टी, एस.डी. काळे, के. एस. भादुले, पी. एम. कवाळे शिक्षक तसेच मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!