आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

जीवनात नेहमी मोठे ध्येय बाळगा -प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे !

देवचंद मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन! 

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (सोमवार 22 जुलै 2024 ) अर्जुननगर.

“विद्यार्थ्यांनी नेहमी छोटी स्वप्ने न पाहता उराशी मोठे स्वप्न बाळगले पाहिजे व मोठी स्वप्ने पाहूनच ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत कष्ट आणि मेहनत घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. कष्टाच्या आणि अभ्यासाच्या जोरावरच आपण अनेक आव्हानांचा सामना करत आपले इच्छित ध्येय नक्कीच गाठण्याचा प्रयत्न करू शकतो ,”असे प्रतिपादन देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. जी. डी. इंगळे यांनी केले. महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्यांनी असे सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखाव्यात, नवीन आव्हाने स्विकारावीत, आपल्यातील कौशल्यांचा विकास करावा आणि आपल्यातील ज्ञान समृद्ध करावे या सर्व गोष्टीतून विद्यार्थी आपले चांगले करिअर नक्कीच निर्माण करू शकतात.

पर्यवेक्षक डॉ.ए. एस डोनर म्हणाले की संरक्षण, पोलीस भरती, बँकिंग, तलाठी अशा भरतीसाठी महाविद्यालयाने सुरू केलेला हा मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. 

उपप्राचार्या  एस. पी. जाधव यांनी अलीकडील काळात स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींचा टक्का वाढताना दिसत असल्याचे अधोरेखित करून मुलींनी महत्त्वाकांक्षी बनावे व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे असे सांगितले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना स्पर्धा परीक्षांची अभिरुची विद्यार्थ्यांच्या मनात अकरावी – बारावी पासूनच निर्माण व्हावी तसेच पदवीनंतर अभ्यासाची तयारी न करता आतापासूनच तयारी केली तर स्पर्धा परीक्षांचा भक्कम पाया कनिष्ठ महाविद्यालया पासूनच निर्माण होईल व पदवीनंतर अशा स्पर्धा परीक्षा देणे खूप सोपे जाईल आणि याच उद्देशाने या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात महाविद्यालयात केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रा. वैभव पाटील यांनी मानले.

कार्यक्रमासाठी प्रा.राजकुमार कुंभार, प्रा सागर परीट, डॉ. भरत पाटील, प्रा. एन ए पाटील, प्रा.नवनाथ कुंभार, प्रा. अर्चना पाटील, प्रा. सदानंद झळके, डॉ. राहुल घटेकरी, प्रा. तुकाराम पाटील, प्रा.कृष्णामाई कुंभार, प्रा.कल्पना पाटील उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!