आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

“हालशुगर”आपल्या विश्वासावरच मार्गक्रमणा करणार! -अण्णासाहेब जोल्ले!

तीन दिवसीय आयोजित आरोग्य तपासणी शिबिर!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (24) शंकरानंदनगर निपाणी.

आपणा सर्व कामगार बंधूंच्या, संचालकांच्या व अधिकाऱ्यांच्या विश्वासावरच हालशुगरची वाटचाल चालू असून भविष्यात देखील अशा प्रकारच्या अनेक आरोग्य शिबिरासह कामगारांच्या हिताचे सर्व ते निर्णय घेऊन मार्गक्रमना करणार असून या कामी योग्य ते योगदान देऊन आपण देखील या सत्कार्यात सहभागी होण्याचे आवाहन काल माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी  केले. ते काल हालसिद्धनाथ कारखान्यावरील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसीय आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना बोलत होते.

प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालक श्रीकांत बन्ने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

खासदार जोल्ले पुढे म्हणाले कारखान्याच्या वाटचालीमध्ये कामगारांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कामगारांनी कारखान्यासाठी योगदान द्यावे. कामगारांना काही कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. एकेकाळी बंद पडलेल्या अवस्थेत असलेल्या कारखान्याची वाटचाल 2500  वरून गाळप क्षमता 8500 क्षमते कडे पोहोचली असून भविष्यात कामगारांच्या विश्वासाला पात्र ठरत व संचालक मंडळाला साथी घेऊन 15000 गाळप क्षमतेचे उद्दिष्ट ठेवल्याचे जोल्ले यांनी सांगितले. डिस्टिलरी प्रकल्पामुळे कारखाना विकासाला आधार लाभला असून कामगारांसाठी सर्व सुविधा दिल्या असून तीन दिवस आरोग्य शिबिर होईल. महिनाभरात शेतकरी कामगार भवन, बँक, ज्योती बाजार, कॅन्टीन, या सुविधा देखील सर्वांसाठी उपलब्ध होतील.

अध्यक्ष एम पी पाटील म्हणाले माजी खासदार जोल्ले व आमदार जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने मागील गळीत हंगाम  यशस्वीपणे पार पडला असून या हंगामासाठी देखील सर्वांनी झोकून देऊन काम केल्यास यशाचं शिखर लांब नाही. राजेंद्र खंदारे म्हणाले मागील 35 वर्षापासून कारखाना स्थळावर कोणतेही आरोग्य शिबीर झालेले नसून हा एक स्तुत्य उपक्रम मानावा लागेल. सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरीमठाचे डॉ. शंतनू पालकर म्हणाले येत्या तीन दिवसात होणाऱ्या आरोग्य शिबिराचा योग्य तो लाभ कामगार वर्गाने करून घ्यावा व पुढील उपचारासाठी देखील सिद्धगिरी हॉस्पिटल सदैव आपल्या पाठीशी आहे. यावेळी उपाध्यक्ष पवन पाटील, सुहास घुगे, रोहित परीट, केपन्ना गिजवणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास संचालक आप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, प्रकाश शिंदे, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, वैशाली निकाडे, कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे, किरण निकाडे, सुनील पाटील, डॉ. एस आर पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते. संचालक जयवंत भाटले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!