आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

धर्मप्रेमी हिंदू(Hindu) बांधवांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन!

विशाळगड येथील घटने संदर्भातील निवेदन! निपाणी तहसीलदारांतर्फे‌ निवेदन जाणार!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (24)

संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवून सोडणाऱ्या विशाळगड येथील अतिक्रमण वेळेत न काढणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई व्हावी धर्मप्रेमी शिवप्रेमी आणि निरपराध हिंदू बांधवांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशा मागणीची निवेदन विविध हिंदूत्ववादी संघटनेच्या वतीने बुधवारी दिनांक 24 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली सदरचे निवेदन निपाणी तहसीलदार यांनी बळी गार यांच्याद्वारे हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी विशाळगडावरील प्रकरणामुळे शांतता बिघडवण्याचा  प्रकार घडला आहे अशावेळी अन्याय होत असणाऱ्या शिवभक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे त्यासाठी जात,पात, संघटना, संप्रदाय, पक्ष, भेद ,विसरून संघटित झाले पाहिजे. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीराम सेना कर्नाटक, हिंदू जनजागृती समिती, भाजप, विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था अशा विविध हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!