आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये (Kargil)”कारगिल विजय दिवस” साजरा!

शहिदांना श्रद्धांजली अर्पण! प्रमुख अतिथी म्हणून निपाणी शहर पीएसआय उमादेवी गौडा यांची उपस्थिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (30) कोडणी

येथील अंकुरम  इंग्लिश मिडियम स्कुल, कोडणी – निपाणी येथे आज मंगळवार दि.30/7/2024 रोजी “कारगिल विजय दिवसू” साजरा करण्यात आला- यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरिक्षक उमादेवी गौडा यांची उपस्थिती  तर अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या सौ. चेतना चौगुले यांनी भूषविले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना, राष्ट्रिय एकात्मता, वाढीस लागण्यासाठी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रमुख पाहुण्यांनी यावेळी मुलांना सांगितले.  आपल्या देशाच्या सीमेची व पर्यायाने देशाच्या संरक्षणाची  जबाबदारी व वृत्ती निर्माण या विद्यार्थी दशेतच निर्माण होणे काळाची गरज असून आपण सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात देखील या दृष्टीने मार्गक्रमणा करणे काळाची गरज असल्याचे मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले. आज आपल्या प्रत्येक घरातून एक पुत्र भारत मातेच्या संरक्षणासाठी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्यक्षात सीमेवर न जाता देखील सर्वसामान्य जीवन जगत असताना देखील आपण आपल्या कृतीने देशाचे संरक्षण करू शकतो, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने जगण्याचे ठरविल्यास जीवन सुखकर होईल अशी शेवटी सांगितले. शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांनी कारगिल युद्धातील आठवणी विद्यार्थ्यांच्या समोर सजग करून घटनेची गांभीर्य सांगून अनेक चित्त थरारक अनुभव विद्यार्थ्यांना सांगून कार्यमग्न केले. सर्व उपस्थित मान्यवरांच्या समवेत कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या प्रति सद्भावना व्यक्त करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी श्रेया गुरव हिने केले. सान्वी शाह व श्रेयश कुंभार या विद्यार्थिनी आपल्या मनोगतात कारगिल युद्धातील प्रसंग समोर आणून वातावरण मंत्रमुग्ध केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या कडूनच करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अद्वैत चौगुले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

“कारगिल विजय दिवस” हा शाळेतील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष सेक्रेटरी व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!