आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा :- श्री ए. एम. यादव

निपाणी मराठा मंडळ येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (31)

निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी येथे 31 जुलै 2024 रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग नोंदवला.दिला. पालक मेळाव्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या संदर्भात विशेष मार्गदर्शन श्री ए एम यादव यांनी केले. भविष्यकालीन विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या अडचणी या माध्यमिक स्तरावर सुटल्या तर विद्यार्थ्यांचे भवितव्य चांगल्या पद्धतीने घडू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अवांतर वाचन सुद्धा करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना अलीकडच्या काळात पालक फारच कमी वेळ देत आहेत, पालकांनी सुद्धा कमीत-कमी वेळ का असेना मात्र नियमितपणे विद्यार्थ्यांना दिलाच पाहिजे.

मुख्याध्यापक डी डी हळवणकर यांनी विद्यार्थ्यांचे माध्यमिक स्तर हा भविष्यकालीन येणाऱ्या मेडिकल, इंजिनिअरिंग या क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांनी सुद्धा आत्तापासूनच याच क्षेत्राबद्दल अधिक माहिती घ्यावी. जर पालकांनी आत्तापासून NEET,JEE याबद्दल अधिक माहिती घेतली तर विद्यार्थ्यांना भविष्यकालीन चांगले कॉलेज मिळू शकते. चांगल्या ठिकाणी त्यांना प्लेसमेंट मिळु शकते. त्यासाठी पालकांनी आतापासूनच विद्यार्थ्यांच्या कडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. फक्त विद्यार्थी शाळेत जातो शिकतो त्याला शिक्षक अभ्यास देतात, तो अभ्यास करतो, इतकेच न करता त्याच्यासाठी अधिक माहिती पालकांनी सुद्धा घेणे अलीकडे महत्त्वाचे ठरत आहे. शहरी ठिकाणी पालकांची चौकस विचारसरणी उपयोगी ठरत असते. त्या पद्धतीने निपाणी सारख्या ठिकाणी सुद्धा पालकांनी अधिक विद्यार्थ्यांच्या साठी वेळ द्यावा असे मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच पालक मेळाव्यामध्ये पालकांच्या सोबत सुसंवाद साधण्यात आला पालकांच्या शाळेकडून अपेक्षा त्यांच्या शंकांचे सर्व निरसन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम, हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षिका व्ही व्ही पत्की, एस डी साखळकर, के एल कांबळे, आय एस जबडे, के एस देसाई, यु एम यादव, उपस्थिती होत्या कार्यक्रमाचा समारोप जे आर खपले  यांनी केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!