आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कायदेशीर जागा माझी आहे नाहक बदनामी थांबवा:- श्री आनंदा धामोडे

शेंडुर मधील 29 प्लॉटधारकांचे फसवणूक प्रकरण!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (4)

सर्व्हे नंबर 110/1 (अ) व 110/2 (ब) हिस्सा नंबर 1 शेंडूर  हद्दीतील माझ्या खुद्द वहिवाटीची असलेली जमीन असून परवा काही अज्ञात लोकांनी ग्रामपंचायत ऑफिस समोर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत कागदपत्रांची मागणी केली होती. पण प्रत्येक नागरिकांची आपल्या जागेची कागदपत्रे आपल्या स्वतःकडे असतील ती सादर करून आपल्या न्याय मागावा. अन्यथा ती कायदेशीर जागा माझी असून माझी नाहक बदनामी थांबवण्याचे आवाहन श्री आनंदा धामोडे यांनी केले आहे.ते पत्रकारांशी बोलताना सांगत होते.

ते पुढे म्हणाले वरील सर्व्हे नंबर मधील जमीन मुकुंद नारायण कुलकर्णी यांच्याकडून 1973 साली माझ्या वडिलांनी म्हणजे श्री जानू दत्तू धामोडे यांनी कुळकायद्याने मिळवली असून त्याचे सर्व कायदेशीर कागदपत्रे वारसा हक्काने माझ्याकडे आलेले असून मी कोणत्याही प्रकारे चुकीचे काम केलेले नसून तरी देखील चिकोडी तहसीलदारांतर्फे परत मागील मूळ मालक कुलकर्णींचे नाव लावण्यासाठी बेकायदेशीर तगादा लावला असून हे पूर्णपणे चुकीचे असून सध्या हे प्रकरण धारवाड हायकोर्टात न्यायप्रविष्ट असून आता यामध्ये कोणीही म्हणजेच ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी, कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे देण्याचा प्रश्नच येत नाही. तरी कोणीही अनावश्यक दहशत निर्माण करून आम्हा धामोडे कुटुंबीयांना त्रास देऊ नये असे आव्हान पत्रकार परिषदेमध्ये धामोडे यांनी पुढे केले आहे.

मागील कित्येक दिवसापासून गाजत असलेले शेंडुर मधील सर्व्हे नंबर 110/1 (अ) व 110/1 (ब) मधील प्रकरण सध्या निपाणी तालुक्यामध्ये गाजत असून परवाच ग्रामपंचायत ऑफिस समोर मागील कित्येक वर्षापासून वहिवाटीत असलेले 29 प्लॉटधारक एकत्र येऊन आपल्या हक्का संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी एकत्र आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मागील ग्रामपंचायत माजी अध्यक्ष, ग्राम विकास अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या संगनमताने प्रशासकीय काळात अधिकाऱ्यांना हाताला धरून कागदपत्रे तयार केलेली आहेत. असा आरोप केला होता पण त्याचा स्पष्टपणे आनंदा जानू धामोडे यांनी केला असून अशी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे तयार न केल्याचा निर्वाळा दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!