आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिरगुपी येथे ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न!

ऐतिहासिक 100 घरकुले मंजूर! सर्व गावकऱ्यांचे ग्रामविकास अधिकारी यांचे कडून अभिनंदन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (6)

आपल्या देशाचा आश्वासक विकास व्हायचा असेल तर प्रथम ग्रामीण भागातील जनजीवन सुखकर होणे गरजेचे असते.ही नाळ पकडून शिरगुपी ग्रामपंचायत मध्ये आज ऐतिहासिक अशी एकूण शंभर घरकुले मंजूर करून ग्रामपंचायतीने इतिहास रचला असून परिसरामध्ये या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज सकाळी म्हणजेच 6 ऑगस्ट 2024 रोजी शिरगुपी ग्रुप ग्रामपंचायती तर्फे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आजच्या ग्रामसभेचे नोडल अधिकारी म्हणून आलेले निपाणी इरिगेशन डिपार्टमेंटचे प्रभारी एइइ श्री एन ए माने यांचे गावकऱ्यातर्फे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी स्वागत केले.ग्रामसभेची सुरुवात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कर्नाटक नाडगीताने करण्यात आली.

त्यानंतर ऐतिहासिक अशा 100 घरकुलाचे स्वप्न साकार होण्यासाठी दीडशे पेक्षा जास्त अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी करून ज्या ज्या लोकांनी ग्रामपंचायतीकडे पाठवलेली कागदपत्रे योग्य आहेत अशा 100 अर्जदारांची लॉटरी पद्धतीने शिरगुपीतील एका मुलीच्या हस्ते काढण्यात आल्या. या शंभर घरकुलामध्ये डॉ. बी आर आंबेडकर वसती योजनेतून (डॉ. आंबेडकर आवास) मागास वर्गासाठी (SC Category) एकूण 24 घरकुले मंजूर करण्यात आली. तर बसववसती योजनेतून सर्व सामान्य प्रवर्गासाठी (General Category) 66 घरकुल तर मायनॉरिटी साठी (मुस्लिम समुदाय) 10 घरकुले मंजूर करण्यात आली. सर्व घरकुले लॉटरी पद्धतीने काढल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा चालली होती.

या ऐतीहासीक निर्णयाचे साक्षीदार होण्यासाठी जो तो गावकरी आज सकाळ पासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे येत होते. सदर ग्रामसभेस लाभलेले नोडल अधिकारी श्री.माने यांनी सर्व प्रक्रिया सुरळीत  पाडल्यामुळे ग्रामपंचायत विकास अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


झालेले काम अनमोल..

आजच्या ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या शंभर घरकुलांचे श्रेय कोणीही न घेतल्यामुळे  त्या कामाचे मोल न करता  ते काम अनमोल असे झाले असल्याचे समाधान सर्व ग्राम सदस्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

ऐतिहासिक 100 घरकुले…

शिरगुपी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ग्रामसभेमध्ये शंभर घरकुले मंजूर करून शिरगुपी ग्रामपंचायतीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, क्लार्क, कर्मचारीवर्गाने इतिहास रचना असून आजचा दिवस शिरगुपीच्या इतिहासात सुवर्णाअक्षरांनी लिहिला जाईल एवढं नक्की…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!