आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सौ.भागीरथीबाई शाह कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनीचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुयश!

दहाव्या कर्नाटक राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धा 2024 या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेतील  विद्यार्थ्यांनीचे  राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश. दि. फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनीचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.

नुकत्याच बेंगलोर या ठिकाणी 41व्या कर्नाटका राज्य ज्युनिअर व सीनियर आणि दहाव्या कर्नाटक राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धा 2024 या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत इशारा नासिर मकानदार (59 किलो वजनी गट) हिने द्वितीय क्रमांक व ईकरा नासिर मकानदार (69 किलो वजनी गट) हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच याच ठिकाणी 2024 कर्नाटक राज्य G4 स्पर्धा पार पडल्या यामध्ये गर्ल्स मराठी कॉन्व्हेन्ट स्कूलच्या विद्यार्थिनी आर्या दत्तात्रय कांबळे व आदिती अनिल नारे यांनी सुवर्णपदक पटकावले या सर्व विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाची प्रदर्शन केले. या सर्वांचे संस्थेचे चेअरमन आशिष भाई शाह यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉक्टर एस जे पाटील श्री आर पी बामणे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!