आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

दोन बाळांची आई बनली, सुवर्णपदकाची मानकरी!

खडकलाटच्या शिरपेचात मानाचा तुरा, बेंगलोर येथील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (8) खडकलाट

बेंगलोर येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत वैष्णवी किरण कागे हिने ५५ किलो वजनी गटात झालेल्या स्पर्धेत केरळ विरुद्ध यश मिळवून सुवर्णपदक पटकावले. यामुळे खडकलाट गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून वैष्णवी कागे हिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

वैष्णवी किरण कागे ही खडकलाट गावची सून. मूळची कोडणी गावची सुपुत्री असून तिचा जन्म १२ फेब्रुवारी २००२ मध्ये झाला. तिचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून इयत्ता चौथी पासून दहावीपर्यंत ती देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे नेरलेकर यांच्याकडे कराटे चे शिक्षण घेतले. ४ डिसेंबर २०१६ रोजी तिचा विवाह किरण कागे यांच्याशी झाला. त्यामुळे त्यांना कराटेचे प्रशिक्षण बंद करावे लागले. आठ वर्ष सराव बंद करण्यात आला. या काळात त्यांना दोन मुले झाली असून दोन मुलांच्या आईने आठ वर्षानंतर पुन्हा तायक्वांदो चे शिक्षण घेणे सुरू केले. एप्रिल २०२४ पासून निपाणी तायक्वांदो अकॅडमी यांच्या मार्फत घेण्यात येणारा तायक्वांदो प्रशिक्षण घेण्यास वैष्णवी कागे सुरुवात केली. जिद्द, चिकाटी आणि तायक्वांदो मध्येच आपले करिअर करण्याच्या उद्देशाने यामध्ये वैष्णवी उतरली. चार महिन्याच्या सरावानंतर २८ जुलै रोजी बेंगलोर येथे बसवेश्वर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी निपणीचे प्रशिक्षक जाधव व वैष्णवी कागे हे बेंगलोरला रवाना झाले. ५५ किलो वजनी गटामध्ये केरळ विरुद्ध कर्नाटक अशी स्पर्धा रंगली. स्पर्धा अटीतटीची झाली. विरोधकही भक्कम होते. त्यामध्ये एकाच सामन्यात तीन फेऱ्यांमध्ये १९ विरुद्ध २२ गुणांनी वैष्णवी कागे ही विजयी ठरली. आणि सुवर्णपदकाचे मानकरी ठरली.

बेंगलोर येथे झालेल्या पुमसे मध्ये देखील तिला सुवर्णपदक मिळाले आहे. त्यामुळे वैष्णवी कागे हिला दोन सुवर्णपदक मिळाले. यामुळे खडकलाट सह परिसरात तिचे कौतुक करण्यात येत असून खडकलाट गावातील तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळवणारी वैष्णवी ही पहिलीच महिला ठरली आहे. शिवाय दोन मुलांना सांभाळत तायक्वांदो स्पर्धेत यश मिळवणाऱ्या वैष्णवी हिचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. तत्पूर्वी ही प्राथमिक शाळेत असताना कराटे स्पर्धेत तालुकास्तरीय सुवर्णपदक मिळवलेली होती.

याबाबत वैष्णवी कागे यांना विचारले असता मुलींना व महिलांना आज सर्वत्र भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात भीतीमुक्त जीवन जगायचे झाल्यास कराटे व तायक्वांदो सारखे संरक्षणात्मक शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींना तायक्वांदो सारखे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले पाहिजे. असे सांगितले. असे शिक्षण घेऊन त्या समाजात कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी निर्भयपणे वावरू शकतील. आपण फक्त राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून सुवर्णपदक मिळवून थांबणार नाही. तर देशासाठी काहीतरी करून दाखवणार असल्याचे सांगून खडकलाट परिसरात मुलींच्या साठी तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू करून यातून मुलींना व महिलांना तायक्वांदो प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. एकूणच खडकलाट अनेक कारणासाठी प्रसिद्ध आहे. आता राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून वैष्णवी कागे हीने गावचे नाव उज्वल केले आहे. यासाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!