आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मराठा मंडळ हायस्कूलची वर्षा सहल उत्साहात!

Kiran G.Patil M.No.8884357516


मराठा मंडळ संचलित, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी शैक्षणिक वर्ष 2024-25 यावर्षीची वर्षा सहल दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी निपाणी ते रामलिंग 7 किलो मीटर पायी प्रवास करीत सर्व विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीचा आनंद घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी उन्हाळ्या मध्येच आंबा,फणस, जांभूळ या फळांच्या बिया साठवून त्यांच्यापासून रोपे तयार केली होती. हिच रोपे रामलिंग येथील डोंगरात रोपण करण्यात आली. तसेच पावसामुळे डेंगू आणि मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यानिमित्त निपाणी ते यरनाळ पर्यंत डेंग्यू,मलेरिया यानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली.

पायी प्रवास करत असताना श्रावण महिना असल्यामुळे काही वेळ ऊन काही वेळ पाऊस अशा संमिश्र वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी या सहलीचा प्रवास केला. विद्यार्थ्यांनी रामलिंग येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान झाल्यानंतर दुपारचे जेवण केले व त्यानंतर विविध कला, गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गायन,भाषण तसेच वेगवेगळे प्राण्या-पक्षांचे आवाज, नकला याचे विद्यार्थ्यांच्या कडून कलागुण प्रदर्शन करण्यात आले. सुप्त गुणांना वाव देण्याचा एक प्रकारे येथे हायस्कूल कडून प्रयत्न करण्यात आला. तसेच या ठिकाणी निपाणी भागातील सुप्रसिद्ध रांगोळीकार,चित्रकार हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक श्री.एस डी साखळकर यांनी अवघ्या दहा मिनिटांमध्ये रामलिंग क्षेत्राचे उभेऊभ चित्र ‘थेट रंगाने’ रेखाटले.

सहलीचे प्रमुख श्री.के एल कांबळे यांनी डेंगू आणि मलेरिया यापासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे. घराच्या परिसरामध्ये प्लास्टिक तसेच पाण्याची साठवणूक झाल्याने डासांची उत्पत्ती होते ती कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

निपाणी भागातील निसर्गप्रेमी शिक्षक श्री. एम यादव  यांनी उन्हाळ्या मध्येच विद्यार्थ्यांना सूचना दिली होती की सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरोघरी बियांपासून रोपे तयार करून ठेवावीत व तीच रोपे रामलिंग येथील डोंगरांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत वृक्षारोपण केली. मराठा मंडळ कडून तब्बल 100 हून अधिक झाडांचे रोपण रामलिंग क्षेत्रात करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिपूर्णपणे या एक दिवशी वर्षा-सहलीचा आनंद घेतला. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान करण्यात आले. तसेच डेंगू व मलेरिया याची निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी यांचेकडून जनजागृती करण्यात आली. वर्षा सहलीसाठी मुख्याध्यापक श्री डी.डी हळवणकर, वरिष्ठ शिक्षिका व्ही. व्ही.पत्की, जे.आर खपले, के एस देसाई , यु एम यादव, बी एड च्या प्रशिक्षणार्थी तारळे  उपस्थित होत्या. वर्षा सहलीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शाही व्हेज पुलाव निपाणी भागातील सुप्रसिद्ध आचारी राजू भरमकर यांनी विनाशुल्क बनवून दिला होता.

या वर्षा सहलीसाठी अधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र कदम, शिक्षण समितीचे चेअरमन श्री राजेश कदम यांचे कडून लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!