आपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शाळकरी मुलांची बाईक रायडिंग (Bike Riding) धोकादायक बनत आहे!

अनेक थिल्लर मुलांच्या मुळे, सर्वसामान्यांचे होतायत हाल! प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष!

Kiran G.Patil M.No.8884357516


सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी अनेक गोष्टींची आज गरज लागत असून त्यापैकी एक म्हणजे दुचाकी होय. सर्वसामान्यांच्या घरात देखील दुचाकीने जागा मिळवली असून त्या दुचाकी मुळे कमी वेळेत जास्त कामे होतात हे त्रिवार सत्य जरी असले. तरी त्या दुचाकीचा वापर आपण कोण, आणि कसा करतो यावर सर्व अवलंबून असते.

दुचाकीवरून जाण्याचे सध्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी पूर्वीच्या काळातील जीवनमान पाहिल्यास आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये त्यामुळे अमलाग्र बदल झाला असून दुचाकीचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अनन्यसाधारण आहे व हे आपणास नाकारून चालणार नाही.

कायद्याच्या नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीचे वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांनी पहिल्यांदा आरटीओ कार्यालयात जाऊन  वाहन परवाना काढून हेल्मेट घालून प्रवास करणे हा झाला नियम. पण सध्या शाळकरी मुलांच्या कडून या सर्व गोष्टींना हरताळ पासून शिक्षणाची बारावी पूर्ण न होता वयाची बारा वर्षे पूर्ण व्हायच्या अगोदरच आपण सर्वजण घरातील शाळकरी लहान बालकांना आपली दुचाकी देऊन अनेक कामे करण्यास पाठवत असतो व ते अत्यंत धोकादायक व चुकीचे आहे.

दरम्यान, सकाळी क्लासला जाण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी वापरली जाणारी शाळकरी मुलांची बाईक रायडिंग (Bike Riding) धोकादायक बनत आहे! अनेक थिल्लर मुलांच्या मुळे सर्वसामान्यांचे जीवण धोक्यात आले असून प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून धूम स्टाईल रोडरोमीयाना जाग्यावरच पंचनामा करून गाडी मालकावर गुन्हे नोंद करावेत त्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही.


शाळकरी मुलांची वयस्कर माणसांना चुकीची वागणूक…

एखाद्या शाळकरी मुलास वडीलधाऱ्या व्यक्तीने बाईक वरून जाताना थांबवुन विचारणा केल्यास शाळकरी मुले अरेरावीची उत्तरे देऊन वयस्कर माणसांचा अपमान करून कर्कश्य हॉर्न वाजवत धुम ठोकून पसार होत आहेत.

अधिकारी वर्गाबरोबर सेटलमेंटवरच जास्त भर….

एखाद्या व्यक्तीला प्रशासनाने पकडून हेल्मेट संदर्भात किंवा कागदपत्रा संदर्भात विचारणा केली असता अधिकारी वर्गाबरोबर सेटलमेंटवरच जास्त भर दिल्यामुळे शाळकरी मुलांच्या मध्ये देखील धिटपणा येऊन अनेक लहान मुले भीषण अपघातामध्ये आपला प्राण गमावत असल्याचे आपण रोज पाहतो किंवा ऐकतो.

क्लासवाल्यांचा क्लास घेणे गरजेचे…

निपाणी बस स्टॅन्ड परिसर, अशोक नगर, निपाणी स्टेट बँक परिसर, शिवाजी चौक, नेहरू चौक, देवचंद कॉलेज परिसर निपाणी पी बी रोड, माणिक भुवन, या व इतर अनेक ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून शाळेच्या वेळेपर्यंत क्लासचा भडीमार इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की, सकाळी या रस्त्यावर एवढी शाळकरी मुलं दुचाकी वरून बेफाम जात असतात. त्यामुळे सर्व क्लासवाल्यांचा एक वेळ क्लास घेऊन त्यांना देखील समज देणे गरजेचे आहे. कोणत्याही शाळकरी मुलास क्लासच्या बाहेर दुचाकी आणण्यास मज्जाव केला पाहिजे.

सर्व शाळा महाविद्यालयांची देखील सामाजिक जबाबदारी...

क्लास वाल्यांचा क्लास घेतल्यानंतर प्रशासनाने सर्व शाळा महाविद्यालयांना देखील नोटीस पाठवून वरील गोष्टीची अंमलबजावणी करावयास सांगितल्यास लवकरच या शाळकरी रोडरोमीवोचा बंदोबस्त होऊन अनेक अपघात टळून एक सशक्त निपाणीकर बनण्यास‌ सज्ज होवुया.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!