आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मराठा मंडळ शाळेमध्ये क्रांती दिन आणि नागपंचमी उत्साहात साजरी!

Kiran G.Patil M.No.8884357516


9 ऑगस्ट क्रांती दिन आणि नागपंचमी एकाच दिवशी मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा निपाणी येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात नागपंचमीनिमित्त नागदेवतेची प्रतिमा फळ्यावर रेखाटून तसेच सरस्वती पूजन करून झाली ,नागपंचमीनिमित्त गाणी तसेच पारंपारिक झिम्मा-फुगडी चा खेळ मुलांनी आनंदाने खेळला . कार्यक्रमांमध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि नागपंचमी या आपल्या पारंपारिक सणाबद्दल असणारे महत्त्व प्राथमिकच्या शिक्षिका एन टी खराडे, एस बी कांबळे, ए. एन केसरकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मोहिते, पी.पी. पाटील, पी.एस घाटगे, क्रीडा शिक्षक एस एस पाटील, जे.पी. हंडी, एस. एम साळवे  यांच्यासह सर्व विद्यार्थी आणि पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अशा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असणारे पारंपारिक सण साजरे करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कदम ,शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम ,सौ संगीता कदम ,सौ ज्योती कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!