आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरू अकादमी चे घवघवीत यश!

कोरमंगल इंडोर स्टेडियम बेंगलोर येथे खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडल्या

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नागरी प्रतिनिधी (12)

कोरमंगल इंडोर स्टेडियम बेंगलोर येथे दिनांक एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धा कर्नाटका तायक्वांदो, स्पोर्टस अथॉरिटी ऑफ कर्नाटक, कर्नाटका ओलंपिक असोसिएशन, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धा आठ वर्ष, दहा वर्ष, बारा वर्षे 14 वर्षे आतील वयोगटात पार पडल्या या स्पर्धेत निपाणी येथून सद्गुरु अकादमीचे विद्यार्थी बारा वर्षे आतील गटात अर्णव बोरगावे सुवर्णपदक, वरद पठाडे सुवर्णपदक, लावण्या सावंत रौप्य पदक, पूर्वा साळुंखे रौप्यपदक, अवनी व्हादडी रौप्य पदक, प्रभुदेव हुगार रौप्य पदक, श्रेया मोहिते कास्यपदक, श्रीविराज मोहिते रौप्य पदक, तर 14 वर्षे आतील गटात समर्थ निर्मले सुवर्णपदक, पुष्पा पाटील रौप्य पदक, जानवी काटे रौप्य पदक, समर्थ पाटील रौप्य पदक, सोनल लीगाडे कास्यपदक, पटकावले यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये फाईट, पुमसे, फ्रीस्टाइल पूमसे, अशा स्वरूपात स्पर्धा उत्साहात पार पडल्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री बबन निर्मले यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व पालकांचे प्रोत्साहन मिळाले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातून प्रथमेश भोसले देवदत्त मल्लाडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!