आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयातील तिघांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धे करीता निवड!.

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी अर्जुन नगर (12)

कोल्हापूर जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने हर्क्युलस जिम कुरुंदवाड येथे नुकत्याच जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये देवचंद महाविद्यालयाच्या खालील तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले व राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरले.

1.भूमिका राजेंद्र मोहिते हिने 59 किलो वजनी गटात 150 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला 16 ऑगस्ट पासून बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता तिची ज्युनिअर गटातून निवड झाली आहे.

2.श्री अंकित अरुण खुरपे याने सुद्धा 102 किलो वजनी गटात सहभाग घेऊन 250 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवला.

3.पृथ्वीराज रवींद्र चव्हाण याने 89 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला. या दोघांची 31 ऑगस्ट 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युथ ज्युनिअर व सीनियर स्पर्धेकरीता कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली आहे.

विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ.तृप्ती भाभी शाह, खजिनदार  सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. श्रीमती जी.डी.इंगळे  यांचे प्रोत्साहन लाभले .

तसेच जिमखाना विभागप्रमुख व वेटलिफ्टिंग प्रशिक्षक डॉ. रवींद्र चव्हाण क्रीडा शिक्षक, जिमखाना कर्मचारी  यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाच्या सर्व घटकामार्फत राज्यस्तरीय स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!