आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

जनता शिक्षण मंडळ संचलित देवचंद महाविद्यालय परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

ध्वजवंदनाचा कार्यक्रम डॉ. श्री अरूण बी. पाटील, एम. डी. (मेडिसिन) यांच्या हस्ते संपन्न झाला!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (15) अर्जुननगर 

जनता शिक्षण मंडळ संचालित देवचंद कॉलेज अर्जुन नगर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन गुरूवार, दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी ठीक 08.40 वाजता संस्थेच्या नव्या क्रीडांगणावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम डॉ. श्री अरूण बी. पाटील, एम. डी. (मेडिसिन) डी.सी.एच. सदस्य, जनता शिक्षण मंडळ, अर्जुननगर यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात देवचंद कॉलेज अर्जुननगर व एम डी विद्यालय येथील विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या सीमेवरील जवानांना यावेळी पाठवण्यात आल्या.

याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री.प्रदीप शाह, श्री.प्रदीप मोकाशी जनता शिक्षण मंडळाचे संचालक उपस्थित होते.तसेच श्री एस. टी. यादव प्रभारी मुख्याध्यापक, किरणभाई शाह विद्यानिकेतन, अर्जुननगर श्रीमती एस. एम. गोडबोले, मुख्याध्यापिका, मोहनलाल दोशी विद्यालय, अर्जुननगर प्रो. डॉ. जी. डी. इंगळे प्राचार्या देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रो.डॉ पी पी शाह अर्जुननगर श्री एस. के. कांबळे प्रभारी मुख्याध्यापक, मराठी (कॉन्व्हेंट) प्राथमिक विद्यालय, अर्जुननगर. श्रीमती. के. ए. मोहिते, प्रभारी मुख्याध्यापिका, देवआशिष ग्लोबल स्कूल अर्जुननगर, श्री एम. पी. भोसले, प्रभारी प्राचार्य, जनता शिक्षण मंडळ खाजगी आय.टी.आय., अर्जुननगर कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा संगीता जाधव, पर्यवेक्षक मेजर डॉ अशोक डोनर या पदाधिकाऱ्यांसह सर्व शिक्षक व प्राध्यापक वृंद उपस्थित होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!