आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलने केली ‘गांजा मुक्त भारत व ड्रग्ज मुक्त भारत” च्या रॅलीचे आयोजन.

पदनाट्याच्या सादरीकरणातून केले समाजप्रबोधन! परिसरातुन उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (15) निपाणी 

सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी शाळेमध्ये पारंपारिक रित्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यूदलात रुजू असलेले सैनिक युवराज पाटील यांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या भारतीय जवानांसाठी युवराज पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. लवकरच या राख्या रक्षाबंधनासाठी आपल्या सैनिक बांधवांपर्यंत पाठवल्या जातील.

अंकुरम शाळेने नेहमीच मुलांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवले आहेत. भविष्यात सामाजिक बांधिलकी जपणारी व सामाजिक घडामोडी सोबत स्वतःला जागरूक ठेवणारी सशक्त समृद्ध पिढी निर्माण करण्याचा शाळेचा उद्देश आहे. सध्या निपाणी शहर व परिसरात गांजा व ड्रगचा वापर तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. उच्च प्राथमिक व कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये यांचा अधिक वापर होत असून पालक याबाबत हव्या त्या प्रमाणात जागरूक असल्याची दिसत नाहीत. शिवाय याविरुद्ध कोणी तक्रारही करत नाही.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन अंकुरुमच्या विद्यार्थ्यांनी “स्वतंत-भारत, गांजामुक्त भारत, सुदृढ  भारत – नशामुक्त भारत अशा विविध घोषणांनी शहर व परिसरातील आसमंत दणाणून सोडला. अंकुरम शाळेतर्फे या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक दहा वाजता निपाणी येथील सुप्रसिद्ध असे निपाणी मेडिकल स्टोअर्स येथून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. अशोक नगर, चन्नम्मा सर्कल या मार्गावरून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये ड्रग्स अल्कोहोल तंबाखू याच्या दुष्परिणाम संदर्भात व आपली सामाजिक जबाबदारी ओळखत सर्व विद्यार्थ्यांनी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून टाकला होता.  रॅलीतील सर्व विद्यार्थ्यांनी चन्नमा सर्कल येथे आल्यानंतर एक पदनाट्य सादर केले. यामध्ये ड्रग्ज व नशा करणारी ,अमली पदार्थ गांजा यामध्ये वाहत जाणारी आजची तरुणाई व याचे शारीरिक तसेच सामाजिक परिणाम याची सादरीकरण या पदनाट्या मार्फत करण्यात आले होते.

निपाणी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीला संबोधित करताना संस्थापक सेक्रेटरी अमर चौगुले म्हणाले आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाण्यास आपण पालक म्हणून ही तितकेच जबाबदार असून प्रत्येक पालकाची आज जबाबदारी आहे की आपल्या पाल्याच्या समोर कोणतेही व्यसन न करता एक आदर्श वडील म्हणून आपण आपल्या मुलाच्या समोर जाणं केव्हाही समाजाच्या दृष्टीने व पर्यायाने कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय हितावह असतं. आजच्या तरुण मुलांच्या कडे कुटुंबाने कटाक्षाने लक्ष देऊन त्यांचा मित्रपरिवार देखील तपासणे गरजेचे झाले आहे. रॅलीमध्ये अनेक पालक वर्गाने देखील अंकुरमच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करून भविष्यात देखील असे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा अनमोल सल्ला दिला. यावेळी चन्नम्मा सर्कल येथील सुपर बाजार कडून उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी निपाणी नगरपालिकेचे आयुक्त दीपक हरदी, निपाणी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, शाळेचे संचालक निपाणीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. उत्तम पाटील, सर्जन डॉ. जोतिबा चौगुले, सौ मीना शिंदे शाळेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले शाळेच्या प्राचार्य सौ चेतना चौगुले यांच्यासह शाळेचा सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे आभार अर्पिता चौगुले यांनी मानले.


Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!