आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात!

संस्थाध्यक्ष सी.बी. कुरबेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजवंदन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (16)

श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्री निकेतन कन्नड व मराठी माध्यम शाळा तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूलच्या निपाणी या ठिकाणी ७८ वा स्वातंत्र्य दिन, शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी बी कुरबेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे चेअरमन डॉ. अनिल ससे तसेच शांतिनिकेतनचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले सेकटरी श्री प्रदीप पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अल्का भोसले शाळेचे सर्व शिक्षक वृंद पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या प्रार्थना गीताने झाली तर स्वागत गीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गायले, स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अल्का भोसले यांनी करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, ध्वजारोहण करण्यात आले. या दिनाप्रसंगी विद्यार्थ्यांकडून भाषणे देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. तसेच शाळेच्या शिक्षिका श्रीमती पठाण श्रीमती थोरात श्रीमती पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून मुलांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर कुमार मंदिर मध्ये आंतरशालेय  वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्फूर्ती भाटली हिने तर कु. सृष्टी खरपे हिने आभार प्रदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!