आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

पुढील आर्थिक वर्षात 1000 कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट – संस्थापक अध्यक्ष सी.बी कुरबेट्टी!

संस्थेला मागील आर्थिक वर्षात 10.60 कोटींचा नफा, 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी व्यंकटेश मंदिर येथे संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18) 

सहकारीच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था व सर्व सामान्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी काही  सामाजिक हित जपणारी व समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने एकत्र येऊन 33 वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वर संस्थेची निर्मिती केली होती.

याच रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होऊन 33 वर्षाच्या  अथक प्रयत्नाने संस्थेला आर्थिक वर्षात 10 कोटी 60 लाखांवर निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी दिली. येथील व्यंकटेश मंदिरात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी वीरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी,व हंचिनाळ मठाचे महेशानंद ऊर्फ ईश्वर स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला.

सभेला संबंधित करताना संस्थापक अध्यक्ष डॉ. कुरबेट्टी, म्हणाले, संस्थेचे 16695  अ वर्ग सभासद तर 4844  ब वर्ग सभासद आहेत. संस्थेचे 87.69  लाख भाग भांडवल, 61.86  कोटी निधी, 519.67  कोटीहून अधिक ठेवी, 378.68  कोटींची कर्जे, 619.65  कोटींचे खेळते भांडवल,186.44  कोटींची गुंतवणूक करून आर्थिक वर्षात 10.60  कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. पुढील आर्थिक वर्षात 1000 कोटी पर्यंत ठेवींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम केले जात असल्याची माहिती दिली.

ते पुढे म्हणाले जुन्या इमारतीचे अत्याधुनिक स्वरुपात सुसज्जीत असे रुपांतरीत करण्यात येणार आहे. यावेळी प्राणलिंग स्वामी, महेशानंद स्वामी यांचे आशीर्वचन झाले. संचालक डॉ. एस. आर. पाटील यांनी नफा, तोटा पत्रकाचे वाचन केले. सीईओ शशिकांत आदण्णावर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष सुरेश शेट्टी यांनी ऑडीट रिपोर्टचे वाचन केले. पुष्पा कुरबेट्टी यांनी बसव वचन वाचन केले. श्रीकांत परमणे यांनी प्रास्ताविक केले.

सभेस संचालक डॉ. शंकरगौडा पाटील, किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, रवींद्र शेट्टी, प्रताप मेत्राणी, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, विद्या कमते, भद्रेश फुटाणे, महेश शेट्टी, दिलीप पठाडे, निरंजन पाटील सरकार,गजानन कावडकर व मान्यवर उपस्थित होते. सुजाता जाधव, राजेंद्र मगदूम, सोमलिंग माविनकट्टी यांनी सूत्रसंचालन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!