आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंदची विद्यार्थिनी कु. भूमिका मोहितेचा वेटलिफ्टिंगमध्ये डबल धमाका!      

बारामती येथे झालेल्या जूनियर व सीनियर राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18) 

देवचंद महाविद्यालयाची सुवर्णकन्या कु. भूमिका राजेंद्र मोहिते हिने बारामती येथे झालेल्या जूनियर व सीनियर राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. 59 किलो वजनी गटात खेळताना तिने Snatch प्रकारात , 78 किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये 101 किलो असे एकूण 179 किलो वजन उचलून जूनियर व सीनियर गटात सुवर्णपदके जिंकली. तिच्या या यशाबद्दल देवचंद महाविद्यालयातील सर्व घटकामार्फत अभिनंदन होत आहे.

विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.आशिषभाई शाह, उपाध्यक्ष मा.डॉ.सौ.तृप्ती भाभी शाह, खजिनदार मा. श्री.सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. श्रीमती जी.डी.इंगळे, उपप्राचार्य डॉ.पी.पी शाह यांचे प्रोत्साहन लाभले.

तसेच जिमखाना विभागप्रमुख व वेटलिफ्टिंग प्रशिक्षक डॉ. रवींद्र चव्हाण क्रीडाशिक्षक  जिमखाना कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाच्या सर्व घटकामार्फत राज्यस्तरीय स्पर्धेकरता हार्दिक देत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!