आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीत आज नुतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदांचा फैसला!

दोन्ही गटांना समान संधी, पण काही नगरसेवकांचे अजून देखील तळ्यात मळ्यात, प्रशासन मात्र सज्ज!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (29)

आज होणाऱ्या पालिकेच्या 48 व्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले असून आरक्षण आल्यानंतर येथील प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली होती. निवडणुकीत सुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. इच्छुकांचे दोन्ही गट तुल्यबळ आहेत. निवडणूक प्रक्रियेवेळी शांतता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालिका आवारात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे.

प्रशासनाने यापूर्वीच मतदारांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांन कडे पाठवण्यास मतदारांना निवडणुकीची नोटीस पाठवणे व अन्य आवश्यक तयारी पूर्ण केली असून चिकोडीचे प्रांताधिकारी एस एस संपगावी निवडणूक अधिकारी म्हणून आज काम पाहतील मुख्य सभागृहात सकाळी 10 ते 12 पर्यंत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी इचूकाकडून अर्ज दाखल करून घेतले जातील दुपारी निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होईल. 

दरम्यान, मागील टर्म भाजपकडे सत्ता होती आता राष्ट्रवादी व भाजप गटात काटे की टक्कर आहे. दोन्हीकडे संख्याबळ समसमान असल्याचा दावा करत असले तरी चार नगरसेवक असलेल्या गटाला महत्त्व आले आहे. त्यांची भूमिका निर्णयाक ठरणार असून तेच आजच्या निवडीमध्ये किंगमेकर ठरणार असल्याचे परिसरातून बोलले जात आहे. सध्या भाजपकडून सोनल कोठडीया अरुणा मुदकुडे तर राष्ट्रवादीकडून अनिता पठाडे व शांती सावंत यांची नावे चर्चेत असून उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय सांगावकर यांचे पारडे जड असून त्यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची आत्ताच शक्यता वर्तवली जात आहे. या शर्यतीत भाजपकडून संतोष सांगावकर व सद्दाम नगारजी यांची देखील नावे चर्चेत आहेत. पण त्यासाठी सर्वांची सहमती मात्र गरजेची असून यावरील दोन्ही पदाचा फैसला आज होणार असला तरी आजच्या निवडीनंतर निपाणी च्या राजकारणात एक वेगळा पायंडा किंवा युती निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!