आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी आयकर विभागाकडून “आऊटरिच” (Outreach) कार्यक्रमाचे आयोजन!

निपाणी आय एम ए हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (29)

भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात सर्वात महत्त्वाचा घटक असलेला विभाग म्हणजे आयकर विभाग होय. भारतातील अनेक करदात्यांच्या सहकार्यामुळेच अनेक मोठमोठे प्रकल्प हाती घेऊन विकासाची गंगा आणण्याचे काम प्रशासन करत असते. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा आयकर विभागाला नियमाप्रमाणे देऊन आज अनेक जण या स्वरूपात भारताला महासत्ता होण्याच्या दृष्टीने पाठबळ देत आहेत व ही समाधानाची बाब आहे. याच गोष्टीचे महत्त्व विशद करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे निपाणी आयकर विभाग प्रमुख देसाई म्हणत होते.

ते काल निपाणी आय एम ई हॉल येथे आयोजित केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांना संबोधित करताना आयकर विभागाकडून आयोजित केलेल्या आऊटरिच (Outreach) कार्यक्रमातून बोलत होते.

प्रारंभी आय एम ए ब्रँच निपाणीचे अध्यक्ष डॉक्टर बसवराज करेपगोळ, सेक्रेटरी अभिषेक माने व सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आयकर विभागाकडून आलेल्या श्री देसाई, शेखर गायकवाड व अजय कुमार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पुढे देसाई म्हणाले की आज शासनाकडून आयकर विभागामध्ये अतिशय सुस्पष्टता आली असून घरबसल्या देखील आपण इन्कम टॅक्स मधील अनेक समस्या किंवा उपाय यावर विचार करू शकतो. इन्कम टॅक्स मधील अतिशय क्लिष्ट असणारे क्लॉज आज इतिहास जमा झाले असून एका क्लिकवर आज आपण आपले आयकर विवरण भरू शकतो, आपण नित्यनेमाने एक महिन्यातून एक वेळा जर आयकर विभागाच्या वेबसाईटला जाऊन त्याचे अपडेट्स पाहिल्यास आपणास भविष्यातील अडचणीवर अगोदरच मात करू शकतो. व आपले विवरण पत्र भरण्याची अडचणी अगोदरच सोडवु शकतो. आमच्या निपाणी कार्यालया मधून देखील आपल्याला वेळोवेळी कोणत्याही प्रकारची मदत केली जाते. यासाठी आपण थोडे सजग असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम कर्नाटक व गोवा रिजन तर्फे आयोजित केल्यामुळे गोव्याहून आलेले आयकर विभाग प्रमुख शेखर गायकवाड यांनी देखील डॉक्टरांप्रती आपल्या भावना कवितेतून सादर करून सोप्या भाषेत आयकर विभागाची माहिती दिली. मागील 75 वर्षापासून आयकर विभागात झालेले बदल व मिळणारा परतावा याची सुसंगत माहिती दिली.

कार्यक्रमांमध्ये प्रश्नोत्तराचा तास देखील ठेवण्यात आला होता त्यामध्ये अनेक डॉक्टर्सनी आपल्या पेशा संदर्भातील येणाऱ्या अडचणी व त्यावरील आपले मत व्यक्त करून आयकर विभागातर्फे त्याचे निरसन करून घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने कुटुंबातील प्रत्येक स्त्रीकडे तिचे स्त्रीधन म्हणून 25 ते 30 तोळे सोने ठेवण्याचा असलेला अधिकार असो किंवा कोरडवाहू जमिनीसाठी 60000 व बागायत जमिनीसाठी 1 लाखापर्यंत आपण शेतीचे उत्पन्न दाखवणे असो, किंवा आपल्याकडे असलेली रोकड असो यासंदर्भात योग्य ते उपाय व मार्गदर्शन सोप्या भाषेत केल्यामुळे आउटरिच कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमास डॉ. सी.बी.कुरबेट्टी, डॉक्टर नितीन शहा, डॉक्टर अरुण पाटील, डॉक्टर राहुल निर्मळे, डॉक्टर अमृत पाटील, डॉक्टर उत्तम पाटील, डॉक्टर सुनिता देवर्षी, डॉक्टर संतोष चव्हाण, डॉक्टर अनिल सनगर, डॉक्टर सुनील ससे, डॉक्टर आशिष पाटील, डॉक्टर महेश कोरे, डॉक्टर अरविंद चौगुले डॉक्टर संतोष चौगुले डॉक्टर शितल‌ शेट्टी, डॉक्टर रवींद्र देवश्री यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!