आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

नुतन नगराध्यक्षा सौ.सोनल कोठडीया यांनी पदभार स्वीकारला!

कै.विश्वासराव शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


मागील महिन्याभरापासून उत्कंठा लागलेल्या व अनेक राजकीय उलथापालथी होऊन अखेर भारतीय जनता पार्टीची दुसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर आज पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

प्रारंभी नूतन नगराध्यक्षा सौ सोनल राजेश कोठडीया व उपनगराध्यक्ष श्री. संतोष हिंदुराव सांगावकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ. शशिकला अण्णासाहेब जोल्ले माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सर्व नगरसेवक कटिबद्ध असून लवकरात लवकर निपाणीचा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी नवीन 38 कोटी रुपयांचा फंड मंजूर केला असून त्याचे काम लवकरच चालू होईल. तसेच पट्टणकुडी गावालगत  बांधण्यात आलेल्या महत्वकांक्षी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील 600 लाभार्थ्यांना येत्या दसऱ्या पर्यंत घरकुले सुपूर्द करण्यात येतील. नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देखील पूर्णपणे लवकरात लवकर दिले जाईल. कार्मिक कर्मचाऱ्यांच्या 48 घरकुले त्यांना सुपूर्द करण्यात येणार असून आणखीन देखील निपाणीच्या विकासासाठी फंड कमी पडत असल्यास आम्ही तो उपलब्ध करून देऊन निपाणीला गतवैभव प्राप्त करून देण्याची ग्वाही दिली.

सत्काराला उत्तर देताना नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष आणि देखील सर्व नगरसेवक नगरसेविकेना आपल्या सोबत घेऊन कोणतेही सुडाचे राजकारण न करता सर्वांची कामे करून एक आदर्श निपाणी नगरी म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी आम्ही कठिबद्ध असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून व त्यांच्या प्रेरणेतून सर्व स्तरातील नागरिकांचे प्रश्न निकालात काढण्याचे सुतोवाच केले.

दरम्यान, नवीनच प्रस्थापित झालेल्या आघाडीतील एक प्रबळ नगरसेवक विलास गाडीवडर यांनी कोणत्याही भूलथापांवर विश्वास न ठेवता विकासाच्या राजकारणासाठी आम्ही एकत्र आल्याचे सांगून, सर्वांना सोबत घेऊनच विकासाची गंगा निपाणीत आणणार असल्याचे सांगितले. तसेच या आघाडीमध्ये मला व माझ्या तीन सहकाऱ्यांना सामील करून घेतल्याबद्दल माजी खासदार व विद्यमान आमदारांचे  गाडीवडर यांनी विशेष आभार मानले.

यावेळी सभागृहामध्ये सर्व माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपालिका आयुक्त श्री दीपक हरदी यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. सर्व उपस्थितांचे आभार माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले आणि मानले.


जैन समाजातील महिलेला पहिल्यांदाच नगराध्यक्षा होण्याचा मान सोनल कोठाडीया यांनी मिळवला…

अतिशय अतितटीच्या व अनेक स्थित्यंतरे घडत पार पडलेल्या निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद निवडणुकीमध्ये नूतन नगराध्यक्षा झालेल्या सौ सोनल राजेश कोठडीया यांनी जैन समाजातील महिलेने पहिल्यांदाच नगराध्यक्षा होण्याचा मान  मिळवला. यापूर्वी नगरपालिकेच्या इतिहासामध्ये जैन समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पुरुष नगराध्यक्ष म्हणून सुभाष मेहता यांनी मिळवला असून महिला नगराध्यक्ष म्हणून यांनी आज बाजी मारली आहे. मागील तीस वर्षापासून आपल्या पति बरोबर खांद्याला खांदा लावून काम करून एक यशस्वी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


अवघा जैन समाज आज नगरपालिकेत…

कित्येक वर्षानंतर आपल्या समाजातील महिलेला नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर अवघा जैन समाज आज नगरपालिकेमध्ये पदग्रहण समारंभात आवर्जून उपस्थित होता. त्यांच्या समाजाचा एक प्रतिनिधी आज निपाणीकरांच्या सहकार्याने या पदापर्यंत पोचल्यामुळे सर्व जैन समाजाने देखील सर्वांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!