आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कोगनोळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे उज्वल यश!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (2)

कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी संकुलाने कुर्ली येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्वल यश संपादन केले आहे . ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये संकुलातील मुलांनी आणि मुलींनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये रनिंग इव्हेंटमध्ये योगेश आरगे याचा 800 मीटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तन्मय माने याचा 1500 मीटर मध्ये प्रथम तर आयुष सोळांकुरे याचा तृतीय क्रमांक, तसेच जीवन बोरगावे याचा 3000 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर विनायक जाधव याचा तृतीय क्रमांक तसेच कुणाल जाधव याचा 400 मीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक आलेला असून ट्रिपल जम्पमध्ये जीवन बोरगावे याचा प्रथम क्रमांक तर तन्मय माने याचा द्वितीय क्रमांक आलेला आहे . थाळी फेक स्पर्धेत आयान जमादार याचा द्वितीय क्रमांक तसेच हॅमर या स्पर्धेत आदित्य पाटील याचा प्रथम तर आयान जमादार याचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. लांब उडी या स्पर्धेत श्रुती शिरगुप्पे हिचा द्वितीय क्रमांक तर संस्कृती शेटे हिचा तृतीय क्रमांक तसेच उंच उडीमध्ये श्री चौगुले हिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे.

या विद्यार्थ्यांना सरिता दिवटे, प्रज्ञा माने, रुपा खोत, अभिजीत गुडस्कर, निखिल पाटील, शिवाजी डवरे ,शुभम निले, सतीश कुंभार ,ऋतुराज कांबळे , सागर चौगुले , दीपक पाटील , विनायक कांबळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . तसेच संस्थेचे सचिव कुमार पाटील , अध्यक्षा रेखा पाटील , उपाध्यक्ष अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!