आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मंदिर मठांचे संवर्धन काळाची गरज – आमदार शशिकला जोल्ले!

28 लाख रुपये खर्चून निपाणी महादेव मंदिर येथे प्रसादालयाचे उद्घाटन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (1)

मंदिर मठांचे संवर्धन काळाची गरज असुन संस्कृती संवर्धनासाठी देवस्थानाचा विकास आवश्यक असल्याचे मत काल महादेव मंदिर येथील 28 लाख रुपये खर्चून बांधलेल्या प्रसादालयाचे उद्घाटन करताना आमदार शशिकला जोल्ले बोलत होत्या. मंदिरासाठी विकासनिधी देऊन कर्तव्य पार पाडले आहेच पण  आजच्या धावपळीच्या जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व समाजात शांतता नांदण्यासाठी या गोष्टीची नितांत गरज असून भविष्यात देखील या प्रकारची मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

काल रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी येथील श्री महादेव मंदिर सांस्कृतिक प्रसादालयाचे उद्घाटन करून आमदार जोल्ले बोलत होत्या. यावेळी मल्लिकार्जुन स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदिरात श्रावण मासानिमित्त महिनाभर पार पडलेल्या जप योग समाप्तीचा कार्यक्रम यावेळी झाला. भाविक, भक्तांसाठी गरज ओळखून मंत्री असताना येथे २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

प्रारंभी सकाळी विधीवत पूजाअर्चा कार्यक्रम झाला. त्यानंतर फीत कापून भवनाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या, महादेव मंदिर शहर परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदिरातील सामाजिक उपक्रमांमुळे निधी दिला होता. येत्या काळात पालिकेच्या माध्यमातून शहरात आमूलाग्र विकासकामे केली जातील. मंदिर ट्रस्टचे सुनील पाटील म्हणाले, लोकवर्गणीतून मंदिर विकास कार्य सुरू आहे. मंदिराच्या इतिहासात सर्वाधिक निधी आमदार जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिला. भागाच्या विकासासाठी भविष्यात जोल्ले यांच्या पाठीशी सदैव राहू. यावेळी  कै. शिवपुत्र कोठीवाले यांच्या ठेवनिधीतून महाप्रसादाचे वाटप झाले.

कार्यक्रमास व्हीएसएमचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्षा सोनल कोठडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, दादाराजे देसाई, महेश दिवाण, वज्रकांत सदलगे, प्रमोद पणदे,पप्पू पाटील, महालिंग कोठीवाले, गजानन वसेदार, नगरसेविका गीता पाटील, नगरसेवक जयवंत भाटले, राजू गुंदेशा, रवींद्र शेट्टी, दयानंद कोठीवाले,रवींद्र कोठीवाले, शिवकांत चंद्रकुडे,रवींद्र चंद्रकुडे, बाळासाहेब जाधव,संजय मोळवाडे यांच्यासह मान्यवर भाविक उपस्थित होते. इराण्णा शिरगावे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण भोसले यांनी आभार मानले.


 कै. शिवपुत्र कोठीवाले यांच्या ठेवनिधीतून महाप्रसादाचे वाटप ..

निपाणी महादेव मंदिरामध्ये प्रतिवर्षी श्रावण मासानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने जप व श्रावण समाप्ती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादासाठी लागणारा निधी मागील वीस वर्षांपूर्वी निपाणीतील सामाजिक व्यक्तिमत्व कै. शिवपुत्र कोठीवाले यांच्या कल्पक बुद्धीतून एक ठेव रक्कम बँकेमध्ये जमा केली होती. त्या रकमेतून येणाऱ्या लाभांशां मधूनच प्रतिवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व कैलासवासी शिवपुत्र कोठीवाली यांचे चिरंजीव महालिंग शिवपुत्र कोठीवाले यांनी निपाणी नगरीच्या पत्रकारांशी बोलताना  दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!